‘अंगात आलया’ गाण्यावर ‘झोंबिवली’ कलाकारांनी धरला ठेका, सिद्धूची एनर्जी पाहून हरपेल तुमचेही भान

मराठीमध्ये अनेक नवीन चित्रपट येत आहेत. अशातच ‘झोंबिवली‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अमेय वाघ, वैदेही परशुरामी आणि ललित प्रभाकर यांसारखे कलाकार असणार आहेत. नुकतेच चित्रपटातील पहिले गाणे ‘अंगात आलया’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात चित्रपटातील कलाकारांसोबत आणखी एक लोकप्रिय कलाकार झळकत आहे. तो म्हणजे आपल्या सगळ्यांचा लाडका सिद्धू म्हणजेच सिद्धार्थ जाधव. या गाण्यात त्याचा देखील जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे. अशातच त्यांचा या गाण्यावरील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे.

सिद्धार्थ, वैदेही आणि अमेयचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सिद्धार्थ जाधवने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. यात ते तिघेही ‘अंगात आलया’ या गाण्यावर ठेका धरताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये कलाकारांची एनर्जी आणि डान्स सगळ्यांना आवडले आहे. अनेकजण या व्हिडिओवर कमेंट करत आहेत. हा व्हिडिओ शेअर करून त्याने चाहत्यांना या व्हिडिओवर जास्तीत जास्त रिल्स बनवायला सांगितले आहे. (zombivali actors dance on angat alaya song, video get viral)

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

‘झोंबिवली’ या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार सुरू आहे. नुकतेच या चित्रपटातील कलाकार बिग बॉस मराठीच्या घरात आले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार आहेत. या गाण्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “सिद्धार्थ माझ्या गेल्या तिन्ही चित्रपटांत दिसलाय. तो नेहमीच माझ्यासोबत कलाकृतीत एक लकी चार्म असल्यासारखा असतो. या चित्रपटातील हे गाणं त्याच्यासाठी खास लिहिल्यासारखं वाटतं, कारण त्याची ती सकारात्मकता आणि अफाट ऊर्जा. त्याच्या असण्यातच सकारात्मक ऊर्जा सामावलेली आहे. हे गाणं चित्रपटात महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी सिद्धार्थला मी विचारल्यावर त्याचा लगेच होकार येणंही तितकंच महत्त्वाचं होतं. त्याने साकारलेला झोंबी डान्सर हा खरंच स्पेशल आहे.” या गाण्याचं नृत्य दिग्दर्शन रंजू वर्गिस यांनी केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

या गाण्याची चर्चा सध्या सर्वत्र असून अनेकांनी या एनर्जेटिक गाण्याला खूप चांगला प्रतिसाद दिला आहे. तसेच सोशल मीडियावर देखील या गाण्याच्या अनेक रिल्स व्हायरल होताना दिसत आहेत.

हेही वाचा :

‘नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली’, स्वीटूचा स्वीट डान्स व्हिडिओ पाहिलात का?

विशाल निकम बनला ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाचा पहिला फायनॅलिस्ट, ‘झोंबिवली’ कलाकारांनी घेतला वेळेचा खेळ

सुमेध मुद्गलकरच्या ‘डान्स महाराष्ट्र डान्स’च्या ऑडिशनला ९ वर्ष पूर्ण, व्हिडिओ घालतोय धुमाकूळ

 

Latest Post