Thursday, June 13, 2024

‘माझी कहाणी फक्त मलाच माहित’, म्हणत रुपाली भोसलेने केला तिचा सुंदर लूक शेअर

मराठी सिनेसृष्टीतील छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते‘ ही एक ट्रेडिंग मालिका आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र लेखकाने उत्कृष्टरित्या रेखाटले आहे. यातीलच नकारात्मक भूमिका साकारणारी संजना आणि अभिनेत्री रुपाली भोसले. रुपाली नकारात्मक भूमिकेत असूनही प्रेक्षकांमध्ये तिचा चांगलाच दबदबा आहे. रुपाली ही ‘मराठी बिग बॉस २’ ची स्पर्धक होती. त्यानंतर तिच्या चाहत्या वर्गात कमालीची भर पडली आहे. रुपाली तिच्या सौंदर्याची जादू नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना दाखवत असते. अशाच तिचे काही चाहत्यांना घायाळ करणारे फोटो समोर आले आहेत.

रुपालीने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पिवळ्या रंगाचा सुंदर असा शॉर्ट ड्रेस घातला आहे. या फोटोमध्ये तिने केसांची वेणी घातली आहे. तसेच पायात हाय हिल्स घालून ती पोझ देताना दिसत आहे. तिचे हे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरादार व्हायरल होत आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. (actress rupali bhosale share her beautiful photos on instagram)

हे फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “नवीन प्रोजेक्ट, नवीन कहाणी आणि नवीन मी.” तिच्या चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे. तसेच व्हिडिओ शेअर करून तिने लिहिले आहे की, “माझी कहाणी फक्त मलाच माहित आहे.” तिच्या एका चाहत्याने “प्रिटी गर्ल” अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

रुपालीने या आधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिने अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘दोन किनारे दोघी आपण’, ‘कन्यादान’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’, ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’, ‘महासंग्राम’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’ या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच तिने ‘आयुषमान भव’, ‘कसमे वादे’, ‘बडी दूर से आये हैं’, ‘तेनाली रामा’ या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

‘अंगात आलया’ गाण्यावर ‘झोंबिवली’ कलाकारांनी धरला ठेका, सिद्धूची एनर्जी पाहून हरपेल तुमचेही भान

‘स्पायडर-मॅन: नो वे होम’ने अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’लाही टाकले मागे, भारतात पहिल्याच दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

‘नवरी नटली, काळूबाई सुपारी फुटली’, स्वीटूचा स्वीट डान्स व्हिडिओ पाहिलात का?

 

हे देखील वाचा