कहर! ‘या’ अभिनेत्याने १९८९साली फक्त एका तासात कमावले होते ५० हजार रुपये!


मॉडेल, अभिनेते, ऍथलीट मिलिंद सोमण हे कायम चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये तर त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलेलं आहे. या सोबतच ते भारतातले एक सुप्रसिद्ध मॉडेल आणि फिटनेस प्रमोटर देखील आहेत. अनेकदा आपण मिलिंद सोमण यांना वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धांमध्ये सहभागी होताना पाहत असतो. अनेकदा तर आपण त्यांना फिटनेस प्रमोशन करीता संपूर्ण विवस्त्र होऊन गोव्याच्या बिचवर धावताना पाहिलेलं आहे. अशा या अष्टपैलू मिलिंद सोमण यांचे चाहते लाखोंच्या घरात आहेत. तर असे हे सतत चर्चेत असलेले मिलिंद सोमण पुन्हा एकदा लोकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत.

मिलिंद सोमण यांनी मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात केली. मॉडेलिंग दरम्यान त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, त्यानंतर मिलिंद हे आजतागायत मॉडेलिंग आणि बॉलिवूड या दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. नुकताच मिलिंद यांनी स्वतःचा एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या त्यांच्या तारुण्यातील फोटो सह एक भन्नाट किस्सा त्यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. मिलिंद सोमण यांनी हा इंस्टाग्रामवर  हा थ्रोबॅक फोटो शेअर केला आहे.

फोटो शेअर करताना मिलिंद यांनी लिहिलं आहे की १९८९ ची ही माझ्या करियरची पहिली जाहिरात आहे. या जाहिरातीपूर्वी मला माहितच नव्हते की मॉडेलिंग हा एक व्यवसाय आहे. अचानक एकेदिवशी मिलिंद याना एक फोन कॉल आला. त्यांना कुठेतरी त्या व्यक्तीने पाहिलं होतं आणि ते त्यांच्या गरजांनुसार परिपूर्ण होते. मिलिंद यांची माहिती काढून त्या व्यक्तीने मिलिंद याना फोन करून कामाच्या ठिकाणी बोलवून घेतले. त्या जाहिरातीसाठी एक तासाचे मिलिंद याना चक्क ५० हजार मिळाले होते. या प्रोजेक्टनंतर मिलिंद यांनी पूर्ण वेळ याच क्षेत्रात देण्यास सुरुवात केली.

यानंतर मिलिंद सोमण हे मॉडेलिंग करत असतानाच त्यांना बॉलिवूडच्या ऑफर्स येऊ लागल्या. त्यांनी यातही नशीब आजमावलं आणि नेहमीप्रमाणे ते यशस्वी देखील झाले. २००० मध्ये आलेल्या नाना पाटेकर आणि तब्बू स्टारर तरकीब या सिनेमातून पदार्पण केलं आणि मग पुन्हा मागे वळून पाहिलंच नाही. आतापर्यंत त्यांनी हिंदी, तामिळ, तेलगू, मराठी आणि इंग्रजी अशा विविध भाषांमधील सिनेमांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची जादू रसिकप्रेक्षकांवर पसरवली आहे.

त्यांनी आतापर्यंत तरकीब, १६ डिसेंबर, जुर्म, अग्निवर्षा, गंध, संहिता, अस्तू, नागरिक, अशोका व हॅमिल्टन अशा हिंदी, मराठी अन् हॉलिवूड तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे. नुकतीच त्यांची पौरुषपूर नावाची नवी वेबसिरीज ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीजच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद आतापर्यंत पाहायला मिळतो आहे.

मिलिंद सोमण हे उत्तम धावपटू तसेच फिटनेस प्रमोटर देखील आहेत. वयाच्या ४३व्या वर्षापासून मिलिंद हे मॅरेथॉन धावू लागले ते अजूनही धावतच आहे. आता पर्यंत मिलिंद यांनी विविध मॅरेथॉन आणि वैयक्तिक धावण्यामधून आतापर्यंत तब्बल १५००० किमी इतकं अंतर कापलं आहे. मिलिंद हे यासोबतच विविध दिवशी उदा., गांधी जयंती, पर्यावरण दिवस, आरोग्य दिवस; समुद्र किनाऱ्यावर धावत असतात. इतकंच नाही तर वयाच्या पंचावन्नव्या वर्षी सुद्धा अनेकदा ते फिटनेस प्रमोट करताना बिच वर विवस्त्र होऊन देखील धावले आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर विवस्त्र धावतानाचा मिलिंद यांचा फोटो चर्चेत आला होता.

आमचा टेलीग्राम चॅनेल येथे क्लिक करुन जॉईन करा.


Leave A Reply

Your email address will not be published.