चार दिवस आधीच प्रदर्शित झाला क्रिती सेननचा ‘मिमी’ चित्रपट; प्रेक्षकांनी दर्शवला जोरदार प्रतिसाद


क्रिती सेनन आणि पंकज त्रिपाठी यांचा ‘मिमी’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर ३० जुलैला प्रदर्शित होणार होता. परंतु हा चित्रपट ४ दिवस आधी प्रदर्शित झाला आहे. जे प्रेक्षक या चित्रपटाची वाट बघत होते, त्यांच्यासाठी हे एक सरप्राईज आहे. पंकज त्रिपाठी आणि क्रिती सेननचा हा चित्रपट एका वेगळ्याच मातृत्वावर आधारित आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक चित्रपट बनवले आहे. परंतु या चित्रपटाची कहाणी एका वेगळ्याच स्तरावर आपल्याला भावुक करते. हा खूपच वेगळा चित्रपट आहे. सरोगसीद्वारे आई बनणाऱ्या एका मुलीची कहाणी दाखवली आहे. या कहाणीत कॉमेडी, इमोशन या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात.

यात एका सरोगसी मातेची कहाणी दाखवली. जी भूमिका क्रिती सेनन निभावत आहे. एका अमेरिकन जोडप्याला बाळ पाहिजे असल्याने, ते बाळ क्रितीच्या गर्भात वाढवण्यासाठी ते तिला विनंती करतात. तसेच त्यासाठी ते तिला २० लाख रुपये देणार आहेत असेही सांगतात. यावर ती तयार होते. पण नंतर त्यांना हे बाळ नको असतं. त्यामुळे ते जोडपं तिला गर्भपात करण्यास सांगतात. या दरम्यान तिची होणारी मानसिक आणि शारीरिक अवहेलना पाहायला मिळत आहे. या चित्रपटात मिमी एका अशा मुलाला जन्म देते, ज्याच्याशी तिचा काहीही संबंध नसतो. परंतु सरोगसी मदर असल्याने, तिचे एक अधिकृत नाते असते. परंतु अचानक ती या सगळ्या गोष्टींसोबत भावनिक दृष्ट्या जोडली जाते.

या चित्रपटातील क्रितीच्या परफॉर्मन्सबाबत बोलायचे झाल्यास, आत्तापर्यंत तिने दिलेला हा बेस्ट परफॉर्मन्स आहे. आत्मविश्वास असो, इमोशन अशी किंवा कॉमेडी असो, यात तिने खूप चांगले काम केले आहे. ‘बरेली की बर्फी’ या चित्रपटात क्रिती पंकज त्रिपाठी यांच्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. परंतु या चित्रपटातील त्यांची केमिस्ट्री खूप वेगळी आहे. दोघांनीही या चित्रपटात जबरदस्त काम केले आहे. त्यांचा हा चित्रपट प्रेक्षकांना जबरदस्त आवडला आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक हा चित्रपट पाहत आहेत. (Mimi movie review kriti senon deliveres her best performance with Pankaj Tripathi)

‘मिमी’ चित्रपटात क्रितीसोबत सुप्रिया पाठक, पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर, मनोज पाहवा हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाची शूटिंग मागच्या वर्षी पूर्ण झाली आहे. दिनेश विजान हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रूद्र’ वेबसीरिजमधून अजय देवगण करणार ओटीटीवर पदार्पण; म्हणाला, ‘वाद चालूच असतात आणि…’

-जेव्हा ६४ वर्षीय ‘बिग बीं’नी १९ वर्षाच्या अभिनेत्रीसोबत केलं होतं लिप-लॉक, चाहत्यांमध्ये पसरली होती तीव्र नाराजी

-जेव्हा श्रॉफ परिवार जगायचे हलाखीचे जीवन; घरातील मूलभूत सामान विकून करावा लागला होता उदरनिर्वाह….


Leave A Reply

Your email address will not be published.