रिक्षा चालकाची मुलगी झाली ‘मिस इंडिया २०२०’ ची रनरअप विजेती, वाचा तिच्या संघर्षाची कहाणी

Miss India 2020 Manya Singh Daughter of Rickshaw Driver Lesser Known Facts


भारतात दरवर्षी ‘मिस इंडिया’ हा पुरस्कार प्रदान केला जातो. दरवर्षी एका स्पर्धेमार्फत विजयी स्पर्धक घोषित केले जातात. या वर्षी देखील ही स्पर्धा तेलंगणामध्ये पार पडली. नेहमीच या स्पर्धेची विजेती जी ठरते तिचीच चर्चा जास्त असते. परंतु या वेळेस विनर पेक्षा ही ‘रनरअप’ विजेतीने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. चला तर जाणून घेऊया तिच्या संघर्षाची कहाणी.

तेलंगणामधील एक इंजिनिअर मानसा वाराणसीला बुधवारी (१० फेब्रुवारी) रात्री व्हीएलसीसी फेमिना मिस इंडिया 2020 ची विजेती म्हणून जाहीर केले. हरियाणामधील ‘मनिका श्योकंद’ हिला व्हीएलसीसी फेमिना मिस ब्रँड इंडिया 2020 ची विजेती जाहीर केली आहे, तर ‘मान्या सिंग’ या स्पर्धेची रनरअप स्पर्धक बनली आहे.

मान्या सिंग ही उत्तरप्रदेशमधील एका रिक्षा चालकाची मुलगी आहे. तिच्यासाठी हा रनरअप ‌बनण्याचा आनंद खूप मोठा आहे. कारण किती अफाट कठीण परिश्रमानंतर तिला हा आनंद प्राप्त झाला आहे.‌ मान्याने तिच्या या यशानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यात ती तिच्या मेहनतीबद्दल सांगत आहे. तिने ‘दिसइजमायस्टोरी’ असं म्हणत तिची कहानी प्रेक्षकांसमोर मांडली आहे. तिने असे सांगितले आहे की, ती मिस इंडिया या स्टेजचा उपयोग करून इतरांना प्रेरित करणार आहे.

मान्या ही अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेली मुलगी आहे. ती सांगते की, “माझ्या परीक्षेची फी भरायला माझ्या आई-वडिलांकडे पैसे नव्हते, तेव्हा त्यांनी त्यांच्या जवळ असलेले काही दागिने गहाण ठेवून माझ्या परीक्षेची फी भरली आहे.” मिस इंडियाने मागच्याच महिन्यात एक पोस्ट शेअर केली. ती त्यात अस म्हणते की,”शिक्षण हे एक उत्तम शस्त्र आहे, जे प्रत्येक वेळी आपल्यासोबत असतं.”

त्यानंतर ती सांगते की, ती जेव्हा बारावीत होती, तेव्हा तिला गुणवंत विद्यार्थिनीचा पुरस्कार देखील मिळाला होता. तिने आयुष्यात अनेक गोष्टींसाठी संघर्ष केला आहे. एका रिक्षा चालकाची मुलगी असल्या कारणाने, तिला तिची पुस्तकं विकत घेता येत नसायची त्यामुळे तिला अनेकदा शाळेतून बाहेर देखील हाकलले जायचे.

मिस इंडियाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर एक फोटो शेअर करत ती म्हणते की, “माझं रक्त, माझ्या कष्टाचा घाम आणि डोळ्यातील अश्रू या सगळ्यांमुळे मी माझ्या स्वप्नापर्यंत पोहोचू शकले. यामुळेच माझ्यात एवढी हिंमत आली आहे.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही वाचा-

-हे वाचलंत का? अंबानी कुटुंबाची सून होण्यापूर्वी ‘ती’ होती प्रसिद्ध अभिनेत्री; देव आनंद यांच्या ‘देस परदेस’ चित्रपटातून केली होती अभिनयाची सुरुवात
-Pran @101! जेव्हा मुलांचे नाव ‘प्राण’ ठेवण्यापासून घाबरू लागले होते लोक; ‘असा’ होता अभिनेत्याचा दरारा-वाढदिवस! लग्न समारंभात पाहताच क्षणी टीना मुनीम यांच्या प्रेमात पडले होते अनिल अंबानी; असे जुळले होते लग्न


Leave A Reply

Your email address will not be published.