मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर हिने ‘पृथ्वीराज’ चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यामध्ये तिच्या अभिनयाचे खुप कौतुकही झाले मात्र, चित्रपट बॉक्सऑफिसवर अपयशी ठरला. मानुषी आपल्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल खुप बिंदास्तपणे बोलत असते मात्र, आपल्या वैयक्तीक आयुष्याबद्दल बोलने सतत टाळत असते. मात्र, आता तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे.
पृथ्वीराज फेम अभिनेत्री मानुषी छिल्लर (Manushi Chhillar) हिने आपल्या दमदार अभिनेयाने नुकतंच बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. मानुषीने मिसवर्ल्डचा खिताब जिंकल्यानंतर तिला चित्रपटामध्ये काम करण्यास एंट्री मिळाली. मात्र, सध्या अभिनेत्री आपल्या वैयक्तीक आयुष्यामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. मानुषीच्या आयुष्यामध्ये एका बिजनेसमॅनची एंट्री झाली आहे, त्याचे निखिल कामत (Nikhil Kamath) याच्यासोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत.
माध्यामातील वृत्तानुसार मानुषी छिल्लर आणि निखिल कामथ 2021 सालापासून एकमेकांना डेट करत आसून दोघेही आपल्या नात्यामध्ये खूप सिरिअस आहेत. त्यामुळे दोघेही लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. दोघेही सतत फिरायला जात असतात मात्र, मानुषी सध्या आपल्या करिअरला ध्यान देत आहे. त्यामुळेच अभिनेत्री आपल्या नात्याला जगजाहीर करत नाही.
निखिल कामत हा एक प्रसिद्ध उद्योगपती आहे, मानुषीपूर्वी त्याच्या आयुष्यामध्ये एक महिला होती. 18 एप्रिल 2019 साली निखीलने अमांडा सोबत लग्न केले होते. दोघांचे लग्न इटलीमध्ये धुमधडाक्यात झाले होते, ज्यामध्ये फक्त जवळचे नातेवाईक हजर होते. मात्र, यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि 2021 साली यांचा घटस्फोट झाला.
मानुषीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तिने नुकतंच अभिनेता अक्षय कुमार (Aksay Kumar) याच्यासोबत पृथ्वीराज चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली मात्र, चित्रपट बॉक्सऑफिसवर अपयशी ठरला. दुबइमध्ये पार पडलेल्या ‘फिल्म फेयर मिडिल ईस्ट अवॉर्ड फंक्शन’ मध्ये मानुषी खूप हटके स्टाइलन हजेरी लावली होती, त्यामुळे तिने सर्वांचेच लक्ष वेधले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
किस कसं करावं हेही कार्तिक आर्यनला नव्हतं माहिती! 37 रिटेकनंतर मिळाला होता परफेक्ट शॉट
इंजिनिअर असलेला कार्तिक आर्यन का आला सिनेसृष्टीत ? 1500 रुपयाचा होता पहिला चेक