अर्रर्र! ‘मिस वर्ल्ड २०२१’ स्पर्धेवर कोरोनाचे सावट, एक- दोन नाही, तर तब्बल ‘इतक्या’ स्पर्धकांना लागण


कोरोनासारख्या भयंकर व्हायरसचा सामना आपण दीड वर्षांपेक्षा जास्त काळापासून केला आहे. या व्हायरसची लाट ओसरताना दिसत असतानाच आता नवनवीन प्रकरणं समोर येऊ लागली आहेत. आता जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय सौंदर्यवती स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘मिस वर्ल्ड २०२१’ या स्पर्धेवरही कोरोनाचे सावट पसरले आहे. या स्पर्धेतील १७ स्पर्धकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये स्पर्धेत सामील होणाऱ्या प्रतिभाशाली महिलांचा समावेश आहे. त्यामुळे ही स्पर्धा आता आरोग्य आणि सुरक्षेची काळजी घेता ९० दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. ही स्पर्धा गुरुवारी (१६ डिसेंबर) प्युर्तो रिको येथे पार पडणार होती.

प्युर्तो रिकोच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विभागाकडून सांगण्यात आले आहे की, मिस वर्ल्ड २०२१ (Miss World 2021) स्पर्धेत सहभागी झालेल्या १७ जणांची कोव्हिड-१९ चाचणी पॉझिटिव्ह आढळली आहे. तसेच, प्युर्तो रिकोमधील वृत्तपत्रानुसार, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनने सांगितले की, सात संक्रमित लोकांना वेगळे करण्यात आले आहे.

प्युर्तो रिकोच्या आरोग्य विभागाचे प्रवक्ते लिस्डियन असेवेडो म्हणाले की, १७ जण पॉझिटिव्ह आहेत. बुधवारपर्यंत ही संख्या सातवर असल्याची चर्चा होती. मात्र, ही संख्या वाढली आहे. याव्यतिरिक्त त्यांनी सांगितले की, कोरोना पॉझिटिव्ह लोकांमध्ये स्पर्धेतील उमेदवार तसेच तांत्रिक कर्मचारी यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, सर्व संक्रमित लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

मिस वर्ल्डच्या अध्यक्षा ज्युलिया मोर्ले म्हणाल्या की, “आम्ही जागतिक संकटाचा सामना करत आहोत. त्याचे गांभीर्य ओळखून आम्ही अशी काही तयारी केली आहे, जेणेकरून काही स्पर्धक आमच्यात सहभागी होऊ शकत नसले, तरी त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे मिस वर्ल्ड २०२१ चा किताब जिंकता येईल.” अंतिम निर्णय घेण्यासाठी न्यायाधीशांचे पॅनेल पूर्व-रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ सामग्रीची समीक्षा करतील.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “मिस वर्ल्ड संघटना राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत आहे. आम्ही एक अनुभवी आणि जबाबदार जागतिक संस्था आहोत, जी प्युर्तो रिकोमध्ये आमचा ७० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी खूप उत्साहित आहे. तसेच आम्ही आमच्या सहभागींच्या आणि प्युर्तो रिकोच्या लोकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी समर्पित आहोत.”

विशेष म्हणजे नुकताच काही दिवसांपूर्वी मिस वर्ल्डनंतर सुरू झालेली दुसरी सर्वात जुनी सौंदर्यवती स्पर्धा ‘मिस युनिव्हर्स २०२१’ पार पडली. यामध्ये भारताच्या हरनाज संधूने किताब पटकावत भारताची मान उंचावली होती.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!