एखाद्या गोष्टीसाठी जर नियम लावला जात असेल, तर तो सर्वांनी पाळणे बंधनकारक असते. मात्र, सामान्य लोक तर सोडाच, बॉलिवूड कलाकारही काही नियमांना फाटा देत आपल्याच मनाचे करताना दिसतात. असे करणे त्यांना महागातही पडू शकते. असेच काहीसे आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टबाबत झाले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) आलियाविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला आहे.
नियमांनुसार आलिया भट्टला (Alia Bhatt) १४ दिवसांच्या गृहविलगीकरणात राहायचे होते. मात्र, असे असूनही ती ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरच्या प्रदर्शनासाठी दिल्लीला गेली होती. खरं तर आलियाचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरही तिला गृहविलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले होते.
बीएमसीच्या नियमांनुसार, उच्च जोखमीच्या संपर्क यादीत असलेल्या लोकांना १४ दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहणे खूप महत्वाचे आहे, परंतु मोशन पोस्टर लॉन्चसाठी आलिया भट्ट रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) दिल्लीला गेली होती. आता आलिया भट्टविरोधात एफआयआर नोंदवल्याची चर्चा आहे.
गेल्या दोन- तीन दिवसांपासून सेलिब्रिटींमध्ये कोरोनाचा धोका ज्या प्रकारे वाढत आहे, त्याबाबत लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत करीना कपूर, अमृता अरोरा, संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि त्यांची मुलगी शनाया कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि त्यांचा लहान मुलगा योहान यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
मोशन पोस्टरच्या प्रदर्शनाच्या वेळी रणबीर कपूरने आलिया भट्टला लग्नासाठी विचारले, तू लग्न कधी करणार आहेस. यावर आलिया भट्ट हसली आणि तिने उत्तर दिले की, “लवकरच आपण लग्न करू.”
आलियाच्या चित्रपटाबाबत बोलायचं झालं, तर ती शेवटची ‘सडक २’ या चित्रपटात झळकली होती. आता ती ‘आरआरआर’, ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘तख्त’ यांसारख्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तसेच ती ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही दिसणार आहे. यामध्ये तिच्यासोबत रणबीरही मुख्य भूमिकेत आहे.
हेही वाचा-
- धक्कादायक! राष्ट्रीय नेमबाज कोनिकाची आत्महत्या, ‘देवदूत’ सोनूने पाठवली होती ‘इतक्या’ लाखांची जर्मन रायफल
- स्पायडरमॅन सिनेमाचे तिकीट मिळवण्यासाठी शिल्पाला करावी लागते ‘अशी’ कसरत, पाहा हा व्हिडिओ
- Kiara Advani | अभिनेत्री कियारा आडवाणीची चाहत्यांना खुशखबर, केली कोटीची खरेदी