बांगलादेशी अभिनेत्री राईमा इस्लाम शिमू ही मागील काही दिवसांपासून गायब झाली होती. अशातच तिचा मृतदेह सापडला आहे. तिचा मृतदेह ढाकाजवळील पुलाजवळ बोरीमध्ये सापडला आहे. पोलिसांच्या हाती आलेल्या माहितीनुसार, या भागातील काही लोकांनी १७ जानेवारी रोजी कदमलोटी भागातील अलीपुर पूलाजवळ अभिनेत्रीचा मृतदेह पाहिला आणि पोलिसांना सांगितले.
राईमाची हत्या झाली आहे, असे सांगितले गेले आहे. तिच्या शरीरावर अनेक घाव दिसत आहे. हत्या झाल्यानंतर तिचा मृतदेह पुलाजवळ फेकण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तिचा मृतदेह सल्ली मुल्लाह मेडिकल कॉलेज ऑफ हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला आहे. (Missing Bangladeshi Actress Raima Islam Shimu Body Found In Sack Husband Confesses To Murder)
राईमा बेपत्ता झाल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी कालाबागान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तेव्हाच तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज लावला होता. त्यामुळे त्यांनी तिचा पती शखावत अलीची चौकशी केली होती. तसेच त्याच्या ड्राइवरला देखील ताब्यात घेतले होते.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीच्या मृत्यूमागे तिच्या कुटुंबातील कलह असावा. तसेच तिच्या पतीने तिच्या हत्येची गोष्ट कबूल केली आहे. त्याला आणि त्याच्या एका मित्राला चौकशीसाठी बोलावले होते.
राईमाने १९९८ साली ‘बार्तामान’ या चित्रपटातून तिच्या करीअरला सुरुवात केली. तिने आतापर्यंत २५ चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने अनेक नाटकात देखील काम केले आहे.
हेही वाचा :
- जान्हवी कपूरने बिकिनी फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान, पुन्हा रंगली बोल्डनेसची चर्चा
- धनुष आणि ऐश्वर्या घटस्फोटावर रजनीकांत यांच्या लहान मुलीची प्रतिक्रिया, सोशल मीडियावर शेअर केला बहिणीसोबतचा फोटो
- पहिल्यांदा मंगळसूत्र घातल्यानंरची देसी गर्लने केली भावना व्यक्त, म्हणाली, ‘काळे मनी वाईटापासून दूर ठेवण्यासाठी…