Sunday, July 14, 2024

धनुष आणि ऐश्वर्या घटस्फोटावर रजनीकांत यांच्या लहान मुलीची प्रतिक्रिया, सोशल मीडियावर शेअर केला बहिणीसोबतचा फोटो

साउथ इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये आपला स्वतःचा असा ठसा उमटवणाऱ्या धनुषला (dhanush) चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जात. आपल्या अभिनयाने त्याने स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. परंतु चाहत्यांना अनेक धक्कादायक बातमी आताच दिली. धनुष आणि त्याची पत्नी ऐश्वर्या एकमेकांपासून वेगळे होत आहे. १७ जानेवारीला आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून ही बातमी जाहीर केली. धनुष आणि ऐश्वर्या या दोघांचा अठरा वर्षाचा संसार होता. दोघांनी आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे.

धनुषने दिलेल्या या धक्कादायक बातमीमुळे त्याचा चाहता वर्ग दुखावला आहे. अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आपली मतं व्यक्त केली. रजनीकांतची छोटी मुलगी – ऐश्वर्याची लहान बहीण सौंदर्याने देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

सौंदर्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून आपल्या वडिलांबरोबर आणि बहिणीबरोबर फोटो शेअर करून प्रेम व्यक्त केले आहे. या घटनेवर कोणतीही प्रतिक्रिया न देता तिने हा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये रजनीकांतचा बिलगून दोघी बहिणी दिसत आहेत. ह्या फोटोमधून त्यांचं वडिलांवरील प्रेम दिसून येत आहे. जो फोटो तिने आपल्या अधिकृत अकाउंटवर शेअर केला आहे. तोच फोटो तिने प्रोफाइल म्हणून ठेवला आहे.

धनुष आणि ऐश्वर्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही बातमी सगळ्यांना दिली. खास गोष्ट म्हणजे त्या दोघांनी सारखीच पोस्ट करून ही बातमी दिली. त्यामुळे त्यांनी हा निर्णय सहमतीने घेतला असावा असा अंदाज सगळेजण वर्तवत आहेत. त्यांनी पोस्ट करून लिहिले होते की, “अठरा वर्षांचं नातं, एक मैत्री म्हणून, जोडीदार म्हणून, आयुष्यभरासाठी म्हणुन. आता आम्ही नात्याच्या या टप्प्यात आहोत जिथे एकमेकाला समजून घेणं, ऍडजेस्ट करणं आणि पुढे जाणे हे स्वीकारले पाहिजे. आम्ही नात्याच्या या टप्यात आहोत की, जिथून एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. एकमेकांना जास्त समजून घेणे, स्वतःला समजून घेणार त्यासाठी आम्हाला वेळ आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयाला तुमचा पाठिंबा राहू द्या.”

त्यांनी केलेल्या या पोस्टनंतर त्यांच्या चाहत्यांना खूप दुःख झाले. ऐश्वर्या ही सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे. ऐश्वर्या आणि धनुष यांचा प्रेमविवाह होता. ती देखील एक लेखिका आणि दिग्दर्शक आहे. दोघांना एक मुले आहेत.

हेही वाचा :

पहिल्यांदा मंगळसूत्र घातल्यानंरची देसी गर्लने केली भावना व्यक्त, म्हणाली, ‘काळे मनी वाईटापासून दूर ठेवण्यासाठी…

‘बिग बॉस’मधील करण आणि तेजस्वीच्या नात्याबद्दल करणच्या वडिलांनी दिली प्रतिक्रिया, ऐकून व्हाल हैराण

शबाना आझमींच्या घरी रेखा यांना पाहताच, तिथून निघून गेले होते अमिताभ बच्चन, वाचा ‘तो’ किस्सा

 

हे देखील वाचा