Wednesday, July 3, 2024

पैशावाल्यांचे गिफ्ट बी भारीच राव! मितालीने नवरा सिद्धार्थला पाडव्याचे दिले ‘हे’ महागडे गिफ्ट

दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त कलाकार देखील एकमेकांना भेटवस्तू देतात. यंदा दिवाळीत सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडीने देखील एकमेकांना महागड्या भेटवस्तू दिल्या. सिद्धार्थ आणि मिताली ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय जोडी आहे. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते.

सोशल मीडियावर देखील दोघे मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. नेहमी एकमेकांच्या फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ते चाहत्यांना अपडेट देत असतात. पाडव्यानिमित्त मितालीने (Mithali Mayekar ) सिद्धार्थला एक महागडी भेटवस्तू दिली. मितालीने सिद्धार्थला राडो (rado) कंपनीचे महागडे घड्याळ दिले. या घड्याळाची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. सिद्धार्थने आपल्या इन्स्टाग्रामवर मितालीने दिलेल्या भेट वस्तूचा व्हिडिओ शेअर केला.

व्हिडिओ शेअर करीत सिद्धार्थने “अरे बापरे! माझी बायको आहेच भारी. मला हे घड्याळ मिळालं म्हणून मी अजूनही थरथरत आहे,” असे कॅप्शन दिली. सिद्धार्थची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. सायली संजीव, आरोह वेलणकरसारख्या अनेक कलाकारांसह चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स केल्या आहेत. त्याच्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

 दरम्यान, सिद्धार्थने 2010मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या ‘झेंडा’ चित्रपटातून मराठी सिने जगतात पाऊल ठेवले होते. त्याने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटातही काम केले आहे तर अभिनेत्री मितालीनेही सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने 2009 मध्ये आलेल्या ‘बिल्लू’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दिला सुरूवात केली होती. तिने ‘उर्फी’, ‘यारी दोस्ती’, ‘स्माईल प्लिज’ अशा गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे. (Mithali Mayekar gave this expensive gift to her husband Siddharth Chandekar)

आधिक वाचा-
‘त्या’ व्हायरल व्हिडिओबाबत नाना पाटेकरांनी मागितली माफी, म्हणाले, ‘मला क्षमा करा…’
अनुष्का शर्माने पती विराटचं तोंडभरून केलं कौतुक; म्हणाली, ‘माझं भाग्य आहे की… ‘

हे देखील वाचा