मराठमोळ्या मिथिलाने केले पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमधील घायाळ करणारे फोटो शेअर; चाहत्यांकडून मिळतंय भरभरून प्रेम


ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोबतच हिंदी-मराठी सिनेमाचा रुपेरी पडदा, आपल्या सहजसुंदर अभिनयाने गाजवणारी अतिशय सुंदर, चंचल आणि बबली अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. मिथिलाने तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर बहुतकरून तरुणांमध्ये मोठा चाहतावर्ग निर्माण केला. घनदाट कुरळे केस ही मिथिलाची आणखी एक ओळख आहे. नुसते अभिनयच नाही, तर नृत्य, गायनामध्ये देखील तरबेज असणाऱ्या मिथिलाचे सोशल मीडियावर नेहमी अनेक फोटो व्हायरल होताना दिसतात. ती नेहमीच तिचे अनेक प्रकारचे फोटोशूट करत असते.

आताच्या तरुणाईसाठी फॅशन आयकॉन म्हणून मिथिला नेहमीच चर्चेत येते. याच मिथिलाने तिचे काही नवीन आणि शानदार फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मिथिला जितकी साधी आणि सिंपल आहे तितकीच ती बोल्ड आणि ग्लॅमरस देखील आहे. इंडियन वेस्टर्न सर्वच अवतारात ती आकर्षक आणि लक्षवेधी दिसते.

नुकतेच मिथिलाने ऑफ व्हाइट रंगाच्या ड्रेसमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिने क्रॉप टॉप घातला असून, या टॉपच्या स्लीव्स स्ट्रीप प्रकारातील आहेत. सोबतच तिने फिश कटचा स्कर्ट घातला असून, हातात कट वर्कचा नेट दुपट्टा उठून दिसत आहे. तिच्या स्कर्टवर बारीक बारीक लेअर्स बनलेल्या आहेत. मिथिलाच्या या वेशभूषेत ती जेवढी सुंदर आणि आकर्षक दिसत आहे, तेवढ्याच सुंदर तिच्या पोझ देखील आहे.

तिच्या मेकअपबद्दल सांगायचे झाले, तर तिने अतिशय सिंपल न्यूड मेकअप केला असून, तिचा डार्क लीपशेड सर्वात जास्त आकर्षक दिसत आहे. तिच्या या लूकवर तिचे केस अधिकच आकर्षक दिसत आहे. मिथिलाचा हा अंदाज आणि लूक तिच्या फॅन्ससोबतच कलाकारांना देखील आवडत आहे. तिच्या या फोटोंना १ लाखापेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत.

वेबसीरिजमधून करिअरला सुरुवात केल्यानंतर मिथिलाने ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटात कामं केले आहे. ‘गर्ल इन द सिटी’, ‘लिटिल थिंग्स’ या तिच्या वेबसीरिजना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. मराठमोळ्या मिथिलाचा हा ग्लॅमरस लूक सध्या चर्चेचा विषय ठरतोय.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-रात्री उशिरापर्यंत शूटिंग करताना ‘बिग बीं’ची ‘अशी’ झाली अवस्था; म्हणाले, ‘असंच होतं, जेव्हा…’

-पिवळ्या रंगाच्या ब्लेझर सूटमध्ये श्रुती मराठे दिसतेय खूपच आकर्षक, पाहून चुकेल तुमच्याही हृदयाच्या ठोका

-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?


Leave A Reply

Your email address will not be published.