Monday, February 24, 2025
Home मराठी ‘गोष्ट काळाइतकीच जुनी’, म्हणणाऱ्या मिथिला पालकरचा आयकॉनिक लूक पुन्हा एकदा चर्चेत

‘गोष्ट काळाइतकीच जुनी’, म्हणणाऱ्या मिथिला पालकरचा आयकॉनिक लूक पुन्हा एकदा चर्चेत

मिथिला पालकर  (Mithila Palkar) हिचा समावेश मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत बोल्ड अभिनेत्रींच्या यादीत होतो. पारंपारिक लूकपासून ते अगदी बोल्ड लूकपर्यंत ती प्रेक्षकांना तिचा जलवा दाखवत असते. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रतिसाद मिळत असतो. मागील काही दिवसांपासून मिथिला सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. अनेक बोल्ड फोटोशूट ती सोशल मीडियावर करत असते. तिचा फॅशन सेन्स देखील अनोखा आहे. त्यामुळे तो सोशल मीडियावर नेहमीच लक्षवेधी स्टाईल आयकॉन ठरत असते. अशातच तिचे एक नवीन फोटोशूट समोर आले आहे.

मिथिलाने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. या फोटो ती खूपच ती अगदी परी दिसत आहे. तिने पिवळ्या रंगाचा सुंदर असा फ्रीलचा ड्रेस घातला आहे. तिने सगळे केस मागे बांधले आहेत. तसेच कानात ईअरिंग घातले आहेत. या ड्रेसमध्ये ती वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. (Mithila Palkar share her beautiful photo on social media)

हे फोटो शेअर करून तिने लिहिले आहे की, “गोष्ट जी काळा इतकीच जुनी आहे.” तिचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहे. तिच्या या फोटोवर अभिनेत्री अमृता खानविलकर हिने “ब्युटी”, अशी कमेंट केली आहे. तसेच बाकी अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. या फोटोवर तीन लाखापेक्षाही जास्त लाईक्स आले आहेत.

मिथिलाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, ती मागील काही दिवसात ‘त्रिभंगा’ या चित्रपटात काजोलसोबत स्क्रीन शेअर करत होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला भरभरून दाद मिळाली होती. सोशल मीडियावर सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी मिथिला ही एक आहे. मिथिलाने तिच्या करिअरची सुरुवात ‘वरुण नार्वेकर’ यांच्या ‘मुरांबा’ या मराठी चित्रपटातून केली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अमेय वाघ आणि सचिन खेडेकर यांनी काम केले आहे. यासोबतच तिने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

हातावरील टॅटूमागील गोष्ट सांगत, ‘जीव माझा गुंतला’ मधील ‘मल्हार’ने केला खास फोटो शेअर

सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग करणार एकत्र तिसरा चित्रपट, स्कॉटलंडमध्ये झाला शूटिंगला आरंभ

नाटकाच्या रंगमंचावर झाला उमेश कामतचा वाढदिवस साजरा, व्हिडिओ शेअर करून मानले आभार!

 

हे देखील वाचा