Sunday, May 19, 2024

‘घरातील पडदे फाडून ड्रेस बनवलाय का?’ म्हणत नेटकऱ्यांनी मिथिला पालकरची उडवली खिल्ली

दोन वर्षाच्या मोठ्या प्रतिक्षेतनंतर ‘एली ब्युटी अवॉर्ड 2022’ हा कार्यक्रम बुधवार (दि, 16 नोव्हेंबर) रोजी रात्री हा सोहळा पार पडला असून अनेक टेलिव्हिजन अभिनेत्री आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींनी हजेरी लावली होता. यामध्ये अनेक अभिनेत्रींनी आपला हटके लुक आणि नवीन स्टाइलचे ड्रेस परिधान केले होते. कोणाच्या ड्रेसचे कौतुक झाले तर काहींच्या ड्रेसला ट्रोलर्सचा सामना करावा लागला. यापैकीच ‘लिटिल थिंग’ फेम मिथिला पालकर हिला ट्रोलर्सनी धरेवर धरलं आहे.

मुंबईमध्ये नुकत्याच पार पडलेल्या एली ब्युटी अवॉर्ड 2022 (Elle India Beauty Awards 2022) मध्ये अनेक अभिनेत्रींनी आपल्या लुकने प्रेक्षकांची मनं जिंकली तर काहींच्या ड्रेसच्या स्टाइलमुळे त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला. मिथिला पारकर (Mithila Parkar) या अभिनेत्रीनेही कार्यक्रमामध्ये हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये तिने काळ्या रंगाचा शोल्डर लेस शॉर्ट ड्रेस परिधान केला होता मात्र, तिने नक्की काय घातलंय हे कोणाला कळत नव्हते आणि तिचा मेकअप देखिल विचित्र होता. त्यामुळे तिची तुलना उर्फी जावेद सोबत केली आहे.

 

View this post on Instagram

 

तिच्या स्टाइलमुळे सोशल मीडियावर तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी चांगलीच खिल्ली उडवली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, “हिने कार्यक्रमात येण्यासाठी घरातील पडदे फाडून ड्रेस बनवला आहे का?”, दुसऱ्या युजरने लिहिले की, “हिने घरातील सोफ्यचा कपडा उरलेल्याचा ड्रेस घातला आहे, त्यामुळेच घरचा डोअरमॅट गायब आहे. मिथिला तु तर घालून नाही गेली ना?” अशाप्रकारे मिथिलाच्या ड्रेसची खिल्ली उडवली. तर काहींनी तिला ‘उर्फी जावेद पासून दूर रहा गं’ असंही बजावलं आहे. तर तु या कपड्यांवर “तु कशी बसणार गं” अशी काळजी व्यक्त केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संगीतसृष्टीवर शोककळा! मुलीला सासरी पाठवताच दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध गायकाच्या पत्नीचे निधन
‘बिग बाॅस 16’मध्ये घरातल्या सदस्यांवर कुरघोडी करतेय ‘ही’ स्पर्धक

हे देखील वाचा