बॉलिवूडचे डिस्को डान्सर म्हणून ओळखले जाणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. नुकतचं त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. यानंतर स्वतः चाहत्यांशी संवाद साधत आपल्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात मोठा खुलासा केला आहे.
मिथुन चक्रवर्ती (Mithun chakraborty) यांना शनिवारी, १० फेब्रुवारी रोजी सकाळी मिथुन चक्रवर्ती यांना छातीत दुखायला लागले. त्यानंतर त्यांना कोलकाता मधील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. रुग्णालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, एमआरआयसह अनेक चाचण्या घेण्यात आल्या. दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर १२ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर मिथुन यांनी आपल्या प्रकृतीची अपडेट्स देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोन आला होता याची माहिती देखील दिली. यावेळी त्यांनी दोघांमधील संवाद काय झाला हेदेखील सांगितलं.
हॉस्पीटलमध्ये असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मला फोन आला होता. यावेळी त्यांनी माझ्या तब्येतीची विचारपुस केली. तसेच, मी तब्येतीची काळजी घेत नसल्याने त्यांनी मला ओरडले. काळजी घेण्याचा सल्ला दिला. अशी माहिती डिस्चार्जनंतर मिथुन यांनी दिली.
तसेच, माझी प्रकृती आता ठीक आहे. माझ्या खाण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. मला आता कोणतीही अडचण नाही. मी लवकरच कमबॅक करणार आहे. कदाचीत उद्यापासूनच…असं म्हणत मिथुन यांनी त्यांच्या चाहत्यांना मोठी दिलासा दिला आहे.
मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या बातमीनंतर अभिनेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि बंगालीमध्ये एका व्हिडिओमध्ये म्हटले की, ‘मला अभिमान आहे, मला हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. मी कधीच कोणाकडे माझ्यासाठी काहीही मागितले नाही. न मागता काहीतरी मिळाल्याची भावना आज जाणवते. ती पूर्णपणे वेगळी भावना आहे. खूप छान भावना आहे.’
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘धनुषच्या चित्रपटात काम करणे म्हणजे निव्वळ बळजबरी’, संदीप किशनच्या विधानाने उडाली खळबळ
…म्हणून बिपाशा बसूला करायचे नाही करण सिंग ग्रोवरसोबत काम, अभिनेत्याने केला मोठा खुलासा