Monday, April 20, 2026
Home मराठी अशोक सराफ यांच्या विषयी खंत व्यक्त करत; राज ठाकरे म्हणाले, ‘त्यांना विनोदी अभिनेता म्हणणंच चुकीचं…’

अशोक सराफ यांच्या विषयी खंत व्यक्त करत; राज ठाकरे म्हणाले, ‘त्यांना विनोदी अभिनेता म्हणणंच चुकीचं…’

मराठी सिनेसृष्टीमधील दिग्गज अभिनेता अशोक सराफ यांनी आपल्या दमदार आभिनयाचे विनोदी भूमिकेने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. अशोकजींना कोणत्याही भूमिका सहजच पेलता येतात हे त्यांच्यामध्ये असणारं कौशल्य अनेकांंना भारावून ठेवतं. नुकंतच पुण्यामध्ये त्यांच्या पंच्याहत्तरीचे औतिच्य साधून एक विशेष कार्यक्रम सोहळा रविवार (दि, 8 जानेवारी) रोजी पार पडला. या कार्यक्रमाला नवनिर्माण सेनेच आध्यक्ष राज ठाकरे यांनी देखिल हजेर लावली होती. त्यावेळी त्यांनी अशोकजींचे तोंडभरुन कौतुक केले त्याशिवाय ‘ आपल्याकडे आता मोठी माणसे उरलेली नाहीत त्यामुले आमच्यासारख्या माणसाकडून तुमचा सत्कार उरकावा लागतोय हे दुदैव आहे.’ अशीही खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.

रविवार (दि, 8 जानेवारी) रोजी अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्या पंच्याहत्तरीचे औचित्य साधून पुण्यामध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते अशोकजींचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज ठाकरेंनी व्यासपीठावर भाषण करत असताना अशोकजींचे तोंडभरुन कौतुक केले असून त्यांना विनोदी अभिनेता असा उल्लेख करणे हे त्यांना फार काही पटले नाही.

राज ठाकरे अशोकजींचे कौतुक करत म्हणाले,

“अशोक सराफ हे बोलत असताना मला क्षणभर वाटलं की माझी पंच्याहत्तरी झाली आहे. खरंतर तुम्ही तुमच्याबद्दल बोलायचं होतं, पण ते माझ्याबद्दलच बोलत राहिले. ज्या व्यक्तीला लहान असल्यापासून आजपर्यंत आपण पाहत आलो, त्या व्यक्तीने हा माझा आवडता हे सांगणं हे पण भरुन पावतं. मी त्यांचे कितीतरी चित्रपट पाहिलेत, नाटक बघितलेत. मला त्यांचं ‘डार्लिंग डार्लिंग’ हे नाटक अजूनही आठवतंय. समोर कोणीही कलाकार असू दे, अशोक सराफ यांना काहीही फरक पडला नाही. कोणत्याही चित्रपटात, नाटकांमध्ये त्यांनी स्वत: प्रभाव कायम ठेवला. ही साधी गोष्ट नाही. मी त्यादिवशी त्यांच ‘व्हॅक्यूम क्लिनर’ नाटक पाहिलं. त्यांच्या एण्ट्रीला सर्व ऑडिटोरिअममध्ये टाळ्यांचा कडकडाट पाहायला मिळाला. 50-60 वर्ष स्वत:बद्दल कुतहूल जागृक ठेवणं ही साधीसुधी गोष्ट नाही.

त्यांनी किती साली पहिलं नाटक केलं असेल याबद्दल मला कल्पना नाही. पण आज इतक्या वर्षांनी अशोक सराफ हे नाव घेतल्यानंतर सभागृहाचा कोपरानकोपरा भरला जातो, ही काय साधीसुधी गोष्ट आहे का? खरंतर त्यांना फक्त अभिनेता म्हटलं पाहिजे. त्यांना विनोदी अभिनेता म्हणणंच चुकीचं आहे. अशोक सराफ यांनी इतकी वर्ष नाटक, चित्रपट आणि मालिका या सर्व माध्यमांवर ते झळकले. आता फक्त ओटीटी प्लॅटफॉर्म राहिला आहे.

पण इतकी वर्ष एक कलावंत काम करतोय, आज अशोक सराफ ही व्यक्ती दक्षिणेत असते तर ते मुख्यमंत्री असते. त्यांचा 40-40 कटआऊट लावून त्यावर दूधाने अभिषेक करण्यात आला असता. पण इथे महाराष्ट्रात चांगले कलावंत आहेत, असं सांगत आटपलं जातं. कलाकाराचं महत्त्व परदेशात गेल्याशिवाय कळत नाही. तिथे कलावंतांच्या नावाने विमानतळं असतात.

अशोक सराफ यांचा मी नेहमीच आदर केला आहे. तुमचं मूळ घराणं हे बेळगावचं आणि जन्म मुंबईचा, मला तर वाटतं की तुम्हीच सीमाप्रश्न सोडवला. मला माहिती नव्हते. इतकी वर्षे लोकांना भूरळ घालणे, सतत नवनवीन प्रयोग करणे ही काही सोपी साधी गोष्ट नाही. जर हेच तुम्ही युरोपमध्ये असता तर आज या मंचावर तुमचा सत्कार करण्यासाठी पंतप्रधान असता.

कलावंत, दिग्दर्शक, कवी, चित्रकार, संगीतकार, गायक हे जर आज नसते तर काय झालं असतं? जर ते नसते तर अराजक आले असते. त्यांचे या देशावर खरंच उपकार आहेत. तुमच्यामुळे हा देश चुकीच्या मार्गाला गेला नाही. अशी माणसं पुन्हा होणे नाही. हा दागिना सराफांच्या घरीच मिळू शकतो. आई जगदंबे चरणी मी तुम्हाला उदंड आयुष्य तुम्हाला मिळो आणि आम्हाला सतत त्यांच्याकडून नवनवीन गोष्टी पाहायला मिळो, हीच मी प्रार्थना करतो.”

राज ठाकरेंनी यापूर्वी देखिल अशोकजींचे ‘व्हॅक्युम क्लीनर’ हे नाटक पाहून त्यांचे कौतुक केले होते. त्याशिवाय त्याच्या नाटक कुटुंबासोबत काही फोटो शेअर करत सोशल मीडियावर शेअर केले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आपल्या मुलीचा व्हिडिओ शेअर करताना स्वप्नील जोशी झाला भावुक, म्हणाला…
भीगे होंठ तेरे! मल्लिका शेरावतचे भगव्या रंगाच्या बिकिनीवर फोटो पाहून चाहत्यांनी केली ‘ही’ मागणी

हे देखील वाचा