Sunday, June 2, 2024

अभिमानास्पद! भारताची हरनाज संधू बनली मिस युनिव्हर्स, ‘या’ प्रश्नाचे उत्तर देऊन पटकावला ताज

भारताची हरनाज संधू (Harnaz Sandhu) हिने मिस युनिव्हर्स २०२१ चा ताज स्वतः च्या नावे केला आहे. ७० वी मिस युनिव्हर्स स्पर्धा यावर्षी १२ डिसेंबर रोजी इस्रायलमध्ये पार पडली. या स्पर्धेच्या प्राथमिक टप्प्यात ७५ हून अधिक सुंदर आणि प्रतिभावान महिलांनी भाग घेतला होता. परंतु तीन देशांतील महिलांनी टॉप ३ मध्ये स्थान मिळवले. त्यापैकी एक भारताची हरनाज संधू होती. मात्र, दक्षिण आफ्रिका आणि पॅराग्वे या दोघांनीही मागे टाकून भारताच्या हरनाजने विश्व सौंदर्यवतीचा ताज पटकावला. या सोहळ्याचा भाग होण्यासाठी अभिनेत्री दिया मिर्झाही भारतातून आली होती. अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने यावेळी मिस युनिव्हर्स २०२१ च्या स्पर्धेचे परीक्षण केले.

सर्व टॉप तीन स्पर्धकांना ‘दबावाचा सामना करणाऱ्या महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल’ असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर हरनाजने उत्तर दिले, “तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल की, तुम्ही अद्वितीय आहात आणि तेच तुम्हाला सुंदर बनवते. बाहेर या, स्वतःसाठी बोलायला शिका कारण तुम्ही तुमच्या जीवनाचे नेते आहात.” या उत्तरासह हरनाजने यंदाच्या मिस युनिव्हर्स २०२१ चा खिताब जिंकला.

 कोण आहे हरनाज संधू? 

पंजाबमधील चंदीगड येथील रहिवासी असलेली हरनाज व्यवसायाने मॉडेल आहे. २१ वर्षीय हरनाजने मॉडेलिंग आणि अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आणि जिंकूनही अभ्यासाकडे पूर्ण लक्ष दिले. हरनाजने २०१७ मध्ये मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. यानंतर तिने मिस मॅक्स इमर्जिंग स्टार इंडियाचा किताब पटकावला. ही दोन प्रतिष्ठित खिताब जिंकल्यानंतर हरनाजने मिस इंडिया २०१९ मध्ये भाग घेतला आणि त्यानंतर ती टॉप १२ मध्ये पोहोचली. मॉडेलिंगसोबतच हरनाजने अभिनय क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. हरनाजचे ‘यारा दियां पु बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ असे दोन पंजाबी चित्रपट आहेत.

भारताला दोनदा मिळाले यश

मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताने दोनदा आपले स्थान निर्माण केले आहे. हरनाज ही भारताची तिसरी मिस युनिव्हर्स आहे. सुष्मिता सेनने १९९४ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते, तिने हा ताज मिळवला होता. त्याच वेळी, २००० मध्ये लारा दत्ताने या मुकुटावर आपले नाव नोंदवले होते.

हेही वाचा :

भूतलावर जणू अप्सरा अवतरली! सई ताम्हणकरचे फोटो पाहून तुमच्याही तोंडातून निघतील हेच उद्गार

नृत्याविष्कार करून मानसी पुन्हा एकदा चुकवणार प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका, दणकेबाझ टिझर आला समोर

वाढदिवशी कोणतेही कॅप्शन न देता शाहनाझने केला सिद्धार्थचा फोटो शेअर, सिडनाझ पुन्हा चर्चेत

 

हे देखील वाचा