धक्कादायक! अं’मली पदार्थ तस्कराचा पाठलाग चुकवताना प्रसिद्ध माॅडेलचा भीषण अपघात, उपचारादरम्यान मृत्यू


केरळमधून मोठी बातमी समोर आली आहे. माजी मिस केरळ विजेती अनसी कबीर आणि उपविजेती असलेली अंजना शाजान यांच्या निधनाबाबत मोठा खुलासा झाला आहे. सुरुवातीला या दोघांचे निधन हा केवळ एक अपघात वाटत होता. मात्र, पोलीस तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांचे असे म्हणणे आहे की, अं’मली पदार्थ विक्रेता या दोन मॉडेल्सचा पाठलाग करत होता. त्यामुळे मॉडेल्सच्या ड्रायव्हरने कार वेगाने चालवली, आणि हा अपघात घडला. या अपघातानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.

मॉडेल अनसी आणि अंजना यांच्या ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबरला रात्री उशिरा जवळपास दीड वाजता रस्ते अपघाताचे वृत्त आले होते. विशेष म्हणजे, सुरुवातीला पोलिसांना हा रस्ते अपघात वाटला होता. मात्र, या प्रकरणाचा तपास केल्यानंतर समजले की, दोन्ही मॉडेल्सच्या गाडीचा पाठलाग केला जात होता. (Model Miss Kerala Ansi Kabeer Death Case Revealed Drug Dealer Chasing Car)

एर्नाकुलम शहराचे पोलीस आयुक्त सीएच नागराजू यांनी मंगळवारी (३० नोव्हेंबर) येथे सांगितले की, सैजू थँकचान नावाचा एक व्यक्ती त्याच्या कारमध्ये मॉडेल्सचा पाठलाग करत होता. यादरम्यान एक अपघात झाला, ज्यामुळे मॉडेलचा मृत्यू झाला. अनसी कबीर आणि अंजना शाजन यांच्या कारचा पाठलाग करत असताना कोची येथे कार दुभाजकावर आदळली. यामुळे मॉडेलचा मृत्यू झाला. नागराजू यांनी सांगितले की, सैजू हा अं’मली पदार्थाचा व्यसनी आहे.

केलंय अनेक महिलांचं शोषण
त्यांनी पुढे सांगितले की, सैजूने आधीही अनेक महिलांचे शोषण केले आहे. जर कोणी या प्रकरणात तक्रार दाखल केली, तर आम्ही कारवाई करू. सैजूने चुकीच्या हेतूने मॉडेल्सचा पाठलाग केला. शेवटी हा अपघात घडला. त्यांनी सांगितले की, त्याने मॉडेल्सना थांबण्यास सांगितले होते, जेव्हा त्यांनी नकार दिला, तेव्हा तो कारचा पाठलाग करू लागला.

तरीही सैजूने सांगितले की, त्याला अब्दुल रहमानला गाडी चालवण्यापासून रोखायचे होते. कारण, तो नशेत होता. त्यामुळे त्याने कारचा पाठलाग केला. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सैजूची ऑडी कार जप्त केली आहे. कारमध्ये कंडोम आणि इतर काही औषधे मिळाली होती. कथितरीत्या त्याच्या मोबाईलमध्ये मुलींचे फोटो होते. तसेच, नशेची औषधेही होती.

‘सैजूच्या अं’मली पदार्थांच्या तस्करांची केली जातेय चौकशी’
आयुक्त नागराजू यांनी सांगितले की, आम्ही अं’मली पदार्थांच्या तस्करांची चौकशी केली आहे. त्याच्या संपर्कातील व्यक्तींचीही चौकशी केली जात आहे. त्याच्या जामीन याचिकेच्या फिर्यादी पक्षाने विरोध केला होता.

या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळलेला नाही. त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. आरोपी ३० नोव्हेंबरच्या दुपारी १ वाजेपर्यंत पोलीस कोठडीत होता. रिमांडमध्ये सांगण्यात आले की, अपघात सैजूमुळे झाला. माध्यमांतील वृत्तांनुसार, अब्दुल रहमानने सैजूपासून मॉडेल्सला वाचवण्यासाठी वेगात गाडी चालवली. त्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकाला जाऊन धडकली. याप्रकरणी सैजूच्या कोठडीत आणखी तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Latest Post

error: Content is protected !!