Friday, November 22, 2024
Home टेलिव्हिजन कंगनाच्या ‘लॉकअप’मध्ये ढसाढसा रडायला लागली पूनम पांडे, ‘या’ दुखण्याने आहे अभिनेत्री त्रस्त

कंगनाच्या ‘लॉकअप’मध्ये ढसाढसा रडायला लागली पूनम पांडे, ‘या’ दुखण्याने आहे अभिनेत्री त्रस्त

सध्या अभिनेत्री कंगना रणौतचा (Kangana Ranaut) ‘लॉकअप’ कार्यक्रम तुफान चर्तेत आला आहे. या कार्यक्रमासंबंधित अनेक नवनवीन खुलासे आणि बातम्या समोर येताना दिसत आहेत. पूनम पांडे (Poonam Pandey), पायल रोहतगी (Payal Rohatgi) सारख्या अनेक अतरंगी अभिनेत्रींचा भरणा असलेला हा कार्यक्रम चांगलाच रंगताना दिसत आहे. कार्यक्रमाची निवेदिका म्हणून कार्यरत असलेली कंगणाही कार्यक्रमात आपली डॅशिंग प्रतिमा दाखवताना दिसत आहे. आता या कार्यक्रमाबद्दल नवीनच माहिती समोर आली असून अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडे  एका टास्कमध्ये सहभागी होत नसल्याने रडल्याची बातमी समोर आली आहे. 

अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असते. सध्या ती कंगना रणौतच्या ‘लॉकअप’मध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. सतत कोणाशी तरी वाद घालून आणि काहीतरी कारणाने ती चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहे. आता नुकतीच पूनम पांडे या कार्यक्रमात बाथरुममध्ये ओक्साबोक्सी रडत असल्याची बातमी समोर आली आहे. एका टास्कमध्ये कार्यक्रमातील सदस्यांना दोन गटात विभागले गेले होते. मात्र पाठीच्या दुखण्याने त्रस्त असलेली पूनम या टास्कमध्ये सहभागी होत नसल्याने तिला अपार दुःख झाले आहे. याच कारणाने ती बाथरुममध्ये रडताना दिसली आहे. पूनमला अशा प्रकारे रडताना पाहून पायल रोहतगी तिला समजावत आराम करण्याचा सल्ला देत आहे.

यावेळी पूनम रडत म्हणते, “असं फक्त माझ्यासोबतच का होतंय? मला कधीच अडचण आली नाही. मी स्वतःचा द्वेष करतो. मी एक खेळाडू आहे आणि मी हे काम करू शकत नाही. मी सामान्य नाही.” असेही ती म्हणते. पायल रोहतगी वारंवार विश्रांती घेण्याचा सल्ला देत आहे. त्यानंतर पूनम पांडे विश्रांती घेते. त्याचवेळी ती शांत झाल्यावर पायलने रोहतगीची चेष्टा करायला सुरुवात करते. इतकेच नव्हेतर ती अंजूम अरोडासोबत पायलला असभ्य भाषेत बोलताना दिसत आहे. याआधीही पूनम या कार्यक्रमातील सदस्यांना शिव्या देताना दिसली होती. अशा अनेक कारणांनी सध्या ती या कार्यक्रमात चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

author avatar
Chinmay Remane

हे देखील वाचा