Saturday, April 20, 2024

कंगनाच्या शोमध्ये पायल रोहतगी अंजली अरोरा आणि पूनम पांडे यांच्यात झाली हिंसक मारामारी

‘लॉकअप’ या रियॅलिटी शोमध्ये पूनम पांडेच्या खळबळजनक खुलासे आणि किलर डान्स मूव्ह्जनंतर आता वातावरण हिंसक झाले आहे. शोच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये पायल रोहतगीचे सहकारी स्पर्धक अंजली अरोरा आणि पूनम पांडे यांच्यासोबत टास्क दरम्यान भांडण झाले. हे भांडण केवळ शब्दांवरून झाले नाही, तर ते हिंसक झाले असून, त्यानंतर ‘लॉकअप’चे वातावरण तापले आहे. अंजलीने पायलवर चावल्याचा आरोप केला आहे. तर पायलने सांगितले की, अंजलीमुळे तिचा श्वास गुदमरत होता. या लढतीत पूनम पांडेही उतरली आणि ती पायलशी भिडली.

प्रथम शाब्दिक युद्ध, नंतर धक्काबुक्की

शोच्या प्रोमोमध्ये या लढतीची झलक आधीच दाखवण्यात आली होती. यामध्ये पायल (Payal Rohatgi) टास्कदरम्यान अंजलीच्या हाताला चावताना दिसत आहे. शोमध्ये करणवीर बोहरा (Karanveer Bohra) पायलला किचन एरियापासून दूर घेऊन जाताना दिसत आहे. यानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत अंजली पायलला टास्क पूर्ण करण्यापासून थांबवते. ती साराला स्वयंपाक चालू ठेवण्यास सांगते. दरम्यान, पायल स्वतःला अंजलीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर पायल अंजलीच्या हाताला चावताना दिसत आहे. अंजलीनेही हा मुद्दा बनवला आणि पायलही तिला चावली असल्याचे सांगितले. निशा हे भांडण शांत करण्याचा प्रयत्न करते. पण त्यानंतर पूनम पांडेनेही या लढतीत उडी घेतली.

पूनम पांडे अंजलीला करते सपोर्ट 

बुधवारच्या एपिसोडमध्ये पूनम पांडे या फाईटमध्ये अंजलीला साथ देताना दिसत आहे. पायल म्हणते की, अंजली अरोराने तिला ज्या प्रकारे पकडले त्यामुळे तिचा गुदमरला होता. यानंतर पूनम आणि पायलमध्ये खूप बाचाबाची होते. ही लढाई शाब्दिक युद्ध म्हणून सुरू झाली असेल, पण बघता बघता त्याचे रुपांतर मारामारीत होते.

अली म्हणाला ‘पायल रोहतगी सर्वात मोठी खोटी आहे’

अली मर्चंट हा पायल रोहतगीच्या टीमचा एक भाग असला तरी तो तिच्यासोबत भांडतो. तो पायलला लबाड म्हणतो. तो म्हणतो की, “तू स्वत:ला हुशार समजते, तर माझे ड्रायव्हर आणि मॅनेजरही तुझ्यापेक्षा हुशार आहेत. आम्ही तुझ्याकडे आलो कारण आम्हाला वाटले की, तू एकटी आहेस. पण इथे कोणीही तुझ्यावर विश्वास ठेवत नाही, कारण तू सर्वात मोठी लबाड आहेस.” या एपिसोडमध्ये प्रेक्षकांना जोरदार भांडण पाहायला मिळणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा