Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

राजकुमार राव आणि हुमा कुरेशी यांची डान्स फ्लोअरला धूम, ‘मोनिका ओ माय डार्लिंग’चा टीझर रिलीज

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव(Rajkummar Rao) त्याच्या अभिनयासाठी ओळखला जातो. राजकुमार सध्या त्याच्या आगामी ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या सिनेमामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. नुकताच या सिनेमाचा टीझर आऊट झाला आहे.

‘मोनिका ओ माय डार्लिंग’ हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरैशी (Huma Qureshi) आणि राधिका आपटे(Radhika Apte) देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ हा डार्क-कॉमेडी सिनेमा आहे.

 

View this post on Instagram

 

‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या सिनेमाच्या टीझरमध्ये हुमा कुरैशीचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळत आहे. हुमा तिचा हटके लुक फ्लॉन्ट करताना ट्रेलरमध्ये दिसत आहे. रेट्रो लुकमध्ये हुमा डान्स करताना दिसून येत आहे. हुमा कुरैशी आणि राधिका आपटेचा ट्रेलरमधला अंदाज चाहत्यांना घायाळ करत आहे.

तगडी स्टारकास्ट असलेला ‘मोनिका ओ माय डार्लिंग’
‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या सिनेमाची स्टारकास्ट तगडी आहे. या सिनेमाचं कथानक रहस्यमय आहे. त्यामुळे प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणार आहे. ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ या सिनेमात राजकुमार राव, हुमा कुरैशी, राधिका आपटेसह सिकंदर खेर आणि आकांक्षा रंजनदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा टीझर आऊट झाल्याने प्रेक्षकांना आता सिनेमाची उत्सुकता लागली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
राष्ट्रीय कन्यादिनl आई वडिलांकडून बाळकडू घेत ‘या’ अभिनेत्रींनी चालवला घराण्याचा अभिनय वारसा

रश्मिकासोबत ‘सामी सामी’ गाण्यावर गोविंदाचा भन्नाट डान्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

हे देखील वाचा