Friday, December 1, 2023

बॉलिवूड गाजवणारा अभिनेता ‘राजकुमार राव’ किंग खानमुळेच करू शकलाय पदार्पण; वाचा त्यांच्या प्रथम भेटीचा तो रंजक किस्सा

राजकुमार राव म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील एक प्रतिभासंपन्न असा कलाकार आहे. त्याने कोणाच्याही पाठिंब्याशिवाय या मायानगरीत येत स्वतःचे स्थान निर्माण केले. राजकुमाराने त्याच्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांनाही त्याची दखल घ्यायला भाग पाडले. राजकुमाराने एकदा त्याच्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की तो या इंडस्ट्रीमध्ये शाहरुख खानला पाहून आला आहे. त्याला शाहरुख पासूनच या क्षेत्रात येऊन अभिनय करण्याची प्रेरणा मिळाली. आज ( 31 ऑगस्ट) अभिनेता राजकुमार रावचा वाढदिवस, जाणून घेऊया त्याच्या आयुष्यातील हा रंजक किस्सा.  

याबाबत बोलताना तो म्हणाला की, “मी शाहरुख सरांना पडद्यावर पाहूनच खूप प्रेरित झालो. त्यांना मी पडद्यावर पाहून खूप खुश व्हायचो. त्यांचा अभिनय, त्यांची स्टाईल हे सर्व मला खूप सुखावून जात होती. त्यांनीच मला शिकवले की, जर आपण एखादे स्वप्न पहिले आणि त्या स्वप्नाच्या पूर्ण करण्याच्या मार्गाने प्रवासाला सुरुवात केली तर, आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो.”

“शाहरुख सरांनी मला ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन दोन्ही वेळेस काहींना काही शिकवले. या क्षेत्रात त्यांनी कोणाच्याही पाठिंब्याशिवाय सुपरस्टार आणि किंग खान हे ताज मिळवले. हे खरंच खूप प्रेरणादायी आहे.” असं राजकुमार रावने म्हटले आहे.

राजकुमारने शाहरुख खानच्या भेटीचा एक किस्सा यावेळी सर्वाना सांगताना तो म्हणाला, “क्वीन चित्रपट हिट झाल्यानंतर माझी आणि शाहरुखची भेट झाली. ते मेहबूब स्टुडिओमध्ये शूट करत असतांना आमची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याबद्दल माझ्या मनात असणारा आदर आणि प्रेम अजूनच वाढले. त्यांना भेटण्याआधी मी त्यांचा फक्त फॅन होतो, मात्र त्यांना भेटल्यानंतर मी त्यांचा सर्वात मोठा फॅन झालो. आम्ही जेव्हा फिल्मफेयर पुरस्कारांचे सोबत सूत्रसंचालन केले होते तेव्हा खूप धमाल केली होती.”

येत्या 22 जानेवारीला राजकुमार रावचा ‘द व्हाईट टायगर’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमात त्याच्या सोबत प्रियांका चोप्रा आणि आदर्श गौरव मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा अरविंद अडिग यांच्या कादंबरीवर आधारित असून या कादंबरीला नोबेल पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रामीं बहरानी यांनी केले आहे.

हेही वाचा-
‘ड्रीम गर्ल 2’चा जलवा बॉक्स ऑफिसवर कायम! रिलीजच्या पाचव्या दिवशी कमाईत ‘Gadar 2’लाही पछाडले
कानात झुमका अन् डोळ्यावर गॉगल; देखण्या अभिनेत्रीचा मनमोहक अंदाज पाहाच

हे देखील वाचा