Friday, March 29, 2024

राष्ट्रीय कन्यादिन। आई वडिलांकडून बाळकडू घेत ‘या’ अभिनेत्रींनी चालवला घराण्याचा अभिनय वारसा

रविवार( 25, सप्टेंबर) हा दिवस राष्ट्रिय कन्यादिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात आज मुली गगनभरारी घेताना दिसत आहेत. अस म्हणतात की मुले कुटुंबाचा वारसा पुढे चालवतात, पण आता काळ बदलला आहे. आता मुली आपल्या कुटुंबाचे नाव उज्ज्वल करत आहेत. सिनेसृष्टीतही  अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे चालवला आहे. कोणत्या आहेत त्या अभिनेत्री चला जाणून घेऊ.

करिश्मा कपूर (Karishma Kapoor)  – बॉलिवूड स्टार बबिता आणि रणधीर कपूर यांची मुलगी करिश्मा कपूरने इंडस्ट्रीत मोठे स्थान मिळवले आहे. करिश्मा कपूरने राज कपूर, शशी कपूर यांचा वारसा पुढे नेला. 90 च्या दशकात करिश्मा कपूरचे नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींच्या यादीत होते. आजच्या काळातही या अभिनेत्रीचे सौंदर्य चांगलेच पाहायला मिळते.

काजोल (Kajol) –  बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री तनुजाची मुलगी काजोल हिने चित्रपटसृष्टीत विशेष स्थान मिळवले आहे. काजोलने लहान वयातच आपल्या दमदार अभिनयाने इंडस्ट्रीत एक खास ओळख निर्माण केली होती. अभिनेत्रीने बॉलिवूड स्टार अजय देवगणसोबत लग्न केले. आजही ती इंडस्ट्रीत खूप सक्रिय आहे.

करीना कपूर (Kareena Kapoor) – बॉलिवूडची बेबो म्हणजेच करीना कपूर तिच्या अभिनय आणि फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. करीना कपूर ही बबिता आणि रणधीर कपूर यांची मुलगी आहे. यासोबतच ती ९० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरची बहीण आहे. या अभिनेत्रीने आपल्या कुटुंबाचा अभिनयाचा वारसा अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे नेला आहे.

आलिया भट्ट (Alia Bhatt) –  चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी आलिया भट्टला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. या अभिनेत्रीने फार कमी वेळात इंडस्ट्रीत एक विशेष स्थान मिळवले आहे. आज आलिया तिच्या दमदार अभिनयाने आणि उत्तम चित्रपटांमुळे इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री मानली जाते. तिने हँडसम हंक रणबीर कपूरसोबत लग्न केले आहे. लवकरच हे स्टार कपल पालक बनणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा- रश्मिकासोबत ‘सामी सामी’ गाण्यावर गोविंदाचा भन्नाट डान्स; व्हिडिओ तुफान व्हायरल
‘मला हे सर्व का मिळाले…’, ट्रोलिंगनंतर नेहा कक्करने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया
प्रियांका चोप्राने पती निक जोनासला स्टेजवरचं केले किस, व्हिडिओ तुफान व्हायरल

हे देखील वाचा