Friday, April 19, 2024

‘बिग बॉस’मध्ये असे काय घडले की, ढसाढसा रडले ‘हे’ स्पर्धक?

लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस16‘ मधील सध्या वेगळेच वळण आलेले पाहायल मिळत आहेत. रविवार (दि, 4 डिसेंबर) रोजी प्रसारित झालेल्या भागामध्ये अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. शेखर सुमन  यांनी एमसी स्टॅन याच्या अवतारात घरातील सदस्यांना हसवले तर बिग बॉसने यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासा त्यांना भागा पाडले. या भागामध्ये आपल्याला स्पर्धकच नाही तर व्यक्तीची दुसरी बाजू देखिल पाहायला मिळाली.

टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध कार्यक्रम बिग बॉसमध्ये वेगळ्या प्रकारचे नाते पाहायला मिळाले मात्र, कोणाचे नाते किती खरे आहे आणि किती देखावा हा अनेकांना प्रश्नच पडला आहे. घरामध्ये सतत काहीतरी इमोशनल ड्रामा सुरुच असतो, ज्यामुळे सदस्य प्रेक्षकांचे लक्ष वेधत असताता. गेममुळे काही सदस्या आपल्या भावना मनातच दाबून ठेवत असतता आणि आपले रडणे बाहेर येऊन देत नाहीत. त्यामुळे बिग बॉसने घरातील सदस्यांना आपल्या मनाताली गोष्टी शेअर करण्यासा सांगितल्य तेव्हा प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) आणि मराठी मुलगा शिव ठाकरे (Shiv Thakare) यांनी मनातील भावना व्यक्त करत अश्रू ढासळले.

कार्यक्रमाची स्ट्रॉंग स्पर्धक म्हणून ओळखणारी प्रियंका हिने आपल्या आयुष्यातील काही वैयक्तीक गोष्टी बिग बॉसला सांगितल्या की, मी एक साधारण मुलगी आहे. मला लग्न करायचं आहे. मात्र, तिच्या लवलाइफमुलळे ती खूपच टेंशनमध्ये असते. त्यांमुळे ती या गोष्टी सांगत असताना ढसाढसा रडते. अंकित सोबतच या कार्यक्रमानंतर तिला काम मिळेल की नाही याची देखिल काळजी तिने व्यक्त केली.

 

View this post on Instagram

 

प्रियंकाशिवाय अंकित गुफ्ता (Ankit Gupta), टीना दत्ता (Tina Dutta) आणि शिव ठाकरे आपल्या मनातील भावना व्यक्त करतात. शिव बिग बॉसला भावूक काही गोष्टी सांगतो की, “सगळ्यांना वाटत असेल की, मी डोक्यानी खेळत आहे मात्र, माझ्या घरातील व्यक्तींना माहीत आहे की, मी मनाचच ऐकत आहे. त्यावेळी धनधाकट शिवच्या डोळ्यातही अश्रू अनावर झाले आणि तोही ढसाढसा रडला. घरामध्ये सगळ्यात मस्तीखोर म्हणून ओळखली जाणारी अर्चना गौतम (Archana Gautam) हिने आजपर्यत प्रत्येक सदस्याला त्रास दिला आहे. मात्र, येवेळी तिने देखिल भावूक होऊन आपले दु:ख व्यक्त करत सांगितले की, घराबाहेरील मी आजर्यत कोणत्याच व्यक्तीचे मन नाही दु:खवले, किंवा चुकीचे बोलले नही. मात्र, इथे आल्यापासून मी अशी बनले आहे.”

घरातील सदस्यांनी आपल्या मनातील दु:ख व्यक्त करत गोष्टी सांगितल्या ज्यामुळे त्यांच्या मनातील भार कमी व्हावा, आता पुढच्या भागामध्ये हे सदस्या कशाप्रकारे खेळतील हे पाहणे खूपच महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
आणखी काय हवं! दीपिका पदुकोणने पती रणवीर सिंगसाठी मोडला ‘हा’ नियम
KILLER! दिशा पटानीनं पुन्हा वाढवलं सोशल मीडियाचं तापमान

 

हे देखील वाचा