मराठी टेलिव्हिजनवरील ‘या’ लोकप्रिय मालिका ज्या गुगलवर केल्या गेल्या सर्वात जास्त सर्च


टेलिव्हिजन मालिका या सगळ्यांना खूप आवडतात. अनेकवेळा लोकांना चित्रपट पाहण्यापेक्षा मालिका पाहणे जास्त मनोरंजक वाटते. त्यात मराठी मालिका तर अनेकजण आनंदाने पाहतात. २०२१ वर्षाचा शेवट आला असून, लवकरच आपण २०२२मध्ये प्रवेश करणार आहोत. या काळात अनेक नवीन मालिका आल्या अनेक जुन्या मालिका बंद झाल्या. टेलिव्हिजनवर मालिका बघण्यासोबतच काही अशा मालिका आहेत. ज्या गुगलवर देखील मोठ्या प्रमाणात सर्च केल्या गेल्या आहेत. चला तर जाणून घेऊया त्या मालिकांबद्दल ज्या यावर्षी गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केल्या आहेत.

देवमाणूस :
झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ही मालिका गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केली गेली. मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे पात्र नकारात्मक होते, तरी देखील मालिकेला अल्पावधीतच अमाप प्रेम मिळाले. ही मालिका गुन्हेगारीशी निगडित असली, तरी देखील मालिका अत्यंत खुमासदार शैलीत प्रेक्षक समोर मांडली होती. काही दिवसापूर्वी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु येत्या १९ डिसेंबरपासून या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Most search television serials are on 2021 google)

आई कुठे काय करते :
स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका टीआरपीच्या यादीत नेहमीच उच्च स्थानी असते. मालिकेत येणारे ट्विस्ट सगळ्यांना खूप आवडतात. त्यामुळे मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. मालिका देखील गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केली गेली आहे.

बिग बॉस मराठी ३ :
टेलिव्हिजनवरील सर्वात चर्चेत असणारा शो म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. बिग बॉसचे तिसरे पर्व सुरू होऊन २ महिने झाले आहेत. परंतु इतर मालिकांच्या तुलनेत हा शो गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केल्या जातो. या शोचे मागील दोन्ही पर्व खूप गाजले होते. परंतु हे पर्व काही खास चर्चेत आहे. शोमध्ये रोज नवनवीन गोष्टी पाहायला मिळतात.

सुख म्हणजे नक्की काय असतं :
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका देखील खूप ट्रेण्ड आहे. या मालिकेत अनेक वळणं आली. अनेक संकट आली परंतु या मालिकेला प्रेक्षकांचे नेहमीच प्रेम मिळाले. नुकतेच या मालिकेत जयदीप आणि गौरी यांचा पुन्हा एकदा विवाह चालला आहे. त्यामुळे सध्या ही मालिका चांगलीच चर्चेत आहे.


Latest Post

error: Content is protected !!