×

DID Lil Masters | शोच्या सेटवर ढसाढसा रडू लागली मौनी रॉय, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गेल्या ३० वर्षांपासून, झी टीव्ही भारतीय तरुणांना त्यांच्या गायन, नृत्य आणि अभिनय कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी जागतिक व्यासपीठ प्रदान करत आहे. या चॅनलच्या सर्वात प्रतिष्ठित डान्स रियॅलिटी ‘शो डान्स इंडिया डान्स’ने २००९ मध्ये पदार्पण केले, तेव्हा देशात डान्सची नवी क्रांती घडवून आणली. गेल्या १३ वर्षांत, या शोने भारताची नृत्याची खरी आवड दाखवली आहे. काही उत्कृष्ट टीझर्सद्वारे आपल्या दर्शकांना यावर्षीच्या उत्कृष्ट प्रतिभेची झलक दिल्यानंतर, झी टीव्हीने अलीकडेच ‘डीआयडी लिटल मास्टर्स सीझन ५’ लाँच केला.

शो सुरू झाल्यापासून, प्रेक्षक दर आठवड्याला यंग डान्स टॅलेंटचा आनंद घेत आहेत. या शनिवारी देखील प्रेक्षकांना एक खास ट्रीट मिळणार आहे. ‘डीआयडी लिटिल मास्टर्स’चे स्पर्धक वेडिंग स्पेशल एपिसोडमध्ये काही उत्कृष्ट परफॉर्मेंस सादर करतील. शूटिंग दरम्यान, जजच्या पती-पत्नींना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. परंतु मौनी रॉयचा (Mouni Roy) पती सूरज नांबियार यावेळी येऊ शकला नाही. पण त्याने एका सुंदर व्हिडिओ मेसेजद्वारे मौनीला सरप्राईज दिले आणि या मेसेजने मौनीला खरोखरच भावूक केले, असे म्हणावे लागेल. खरं तर, शूटिंग दरम्यान मौनीने सेटवर आपल्या पतीला किती मिस करते हे सांगितले होते. परंतु असे दिसते की, तिच्या पतीने देखील तिला निराश केले नाही आणि या सरप्राईज व्हिडिओने मौनीच्या डोळ्यात पाणी आणले. (mouni roy crying after seeing husband suraj nambiar heartfelst message)

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

या व्हिडिओमध्ये सूरज म्हणाला की, “मी मौनीला ४ वर्षांपूर्वी माझ्या मित्रांच्या पार्टीत भेटलो होतो. ती इतकी सुंदर दिसत होती की, मला तिच्यावरून नजर हटवता येत नव्हती. माझ्या एका मित्राने मला तिच्याशी संभाषण सुरू करण्यास मदत केली आणि मग आम्ही आमचे नंबर एकमेकांना दिले. हळू हळू आम्ही डेटिंग करू लागलो आणि एक दिवस जेव्हा मौनी, मी आणि काही मित्र सुट्टीवर गेलो होतो, तेव्हा आम्ही मौनीसाठी एक छोटेसे सरप्राईज प्लॅन केले होते. तिला माहित नव्हते की, मी त्याला प्रपोज करणार आहे. मी तिच्यासाठी तिचे आवडते गाणे बॅकग्राउंडमध्ये वाजवले आणि नंतर सुंदर सूर्यास्ताच्या बॅकग्राउंडमध्ये तिला प्रपोज केले. आमच्या लग्नाला तीन महिने झाले आहेत आणि मी सांगू इच्छितो की, तिच्यासोबत जगणं खूप छान वाटतं.”

View this post on Instagram

A post shared by mon (@imouniroy)

मौनी म्हणाली, “सूरजला भेटण्यापूर्वी मी थोडी गप्प-गप्प असायचे. पण त्याने मला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवला. त्याने मला सांगितले की, मला माझी क्षितिजे रुंद करायची आहेत आणि या क्षणी जगण्याची जादू अनुभवायची आहे. मला वाटते की त्यानेच मला जीवनातील खऱ्या जादूची ओळख करून दिली. तो माझ्या आयुष्यात आल्याबद्दल मला खूप कृतज्ञ वाटते. तो माझा खरा जीवनसाथी आहे आणि मी त्याच्यावर खूप प्रेम करते.”

‘डीआयडी लिटल मास्टर्स सीझन ५’चा हा भाग तुम्ही या शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता Zee TV वर पाहू शकता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post