×

लग्नाच्या आधी मुंबईत स्पॉट झालेल्या मौनी रॉयला मीडियाने दिल्या लग्नाच्या शुभेच्छा, यावर ती म्हणाली…

मागील काही काळापासून बॉलिवूडमधील अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकत आहे. कोरोनाचा संसर्ग असूनही सर्व काळजी घेत कलाकार विवाहबंधनात अडकताना दिसत असून, या यादीत आता अजून एका अभिनेत्रीची भर पडणार आहे. टेलिव्हिजनपासून आपल्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजे मौनी रॉय. लवकरच मौनी तिचा बॉयफ्रेंड असलेला सूरज नांबियारसोबत लग्न करणार आहे. मात्र याबद्दल अजूनपर्यंत मौनीने कोणतेही अधिकृत वक्तव्य केले नसले तरी मीडियामध्ये येणाऱ्या बातम्यांनुसार लवकरच मौनी सुरजशी लग्न करणार आहे.

मौनी दुबईमधील उद्योगपती असणाऱ्या सुरज नांबियारसोबत लग्न करणार असून, या लग्नाची जोरदार तयारी चालू आहे. मात्र अजूनही मौनी तिच्या लग्नाबद्दल येणाऱ्या बातम्यांवर काहीही बोलली नाही. तिच्या लग्नाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच मौनीला मुंबईमध्ये एका ठिकाणी स्पॉट केले गेले. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जेव्हा मौनीला पॅपराजी आणि मीडियाने स्पॉट केले तेव्हा तिला सर्वांनी तिला तिच्या लग्नासाठी शुभेच्छा देखील दिल्या. मुंबईमधील लोखंडवाला परिसरात मौनी दिसली. यावेळी तिने नेव्ही ब्लू रंगाचा टॉप आणि ट्राऊझर घातले होते. तिचा हा ड्रेस वेल्वेटचा होता. तिच्या टॉपवर ऑफ ड्युटी असे लिहिले होते, यावरून तिने लग्नासाठी कामातून ब्रेक घेतला असल्याचे देखील स्पष्ट झाले.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

जेव्हा मौनीला पॅपराजीनी लग्नाच्या शुभेच्छा दिल्या तेव्हा तिने आनंदाने सर्वांना धन्यवाद म्हटले. मौनी रॉय गोव्यामध्ये सुरजसोबत लग्न करणार असून, तिच्या लग्नाचे सर्व आधीचे विधी २६ जानेवारीपासून सुरु होणार असून, २७ जानेवारी रोजी ती विवाहबंधनात अडकणार आहे. मौनी आणि सुरज यांनी त्यांच्या लग्नाला येणाऱ्या सर्व लोकांचे खास लक्ष ठेवले आहे. पाहुण्यासाठी त्यांनी गोव्यात एक फाईव्ह स्टार हॉटेल बुक केले आहे. मौनीच्या लग्नाचा व्हेनु पांढऱ्या फुलांनी सजवला जाणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मौनी आणि सूरज यांनी त्यांच्या पाहुण्यांच्या यादीत घट केली असून, मुंबईमध्ये होणारे रिसेप्शन देखील रद्द करण्यात येणार आहे. एका माहितीनुसार त्यांच्या लग्नात सर्व पाहुण्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे.

हेही वाचा :

Latest Post