Friday, March 29, 2024

निरहुआ आणि आम्रपालीच्या जोडीची धमाल, व्हिडिओला मिळाले १ कोटी ३४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

भोजपुरी चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे सुपरस्टार दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआ आणि आम्रपाली दुबे यांची जोडी. निरहुआचे चित्रपट असो किंवा गाणी, रिलीझ होताच धुमाकूळ घालायला सुरुवात करतात. अशामध्ये आम्रपाली आणि निरहुआची जोडी पुन्हा एकदा यूट्यूबवर धमाल करत आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या होळी सणानिमित्त त्यांचे एक गाणे व्हायरल होत आहे. चाहत्यांना हे गाणे भलतेच आवडले आहे.

आम्रपाली आणि निरहुआच्या या भोजपुरी गाण्याला चाहत्यांची किती पसंती मिळत आहे, हे या व्हिडिओला मिळालेल्या व्ह्यूजवरून दिसते. हे गाणे निरहुआ म्युझिक वर्ल्ड यूट्यूब चॅनेलवर अपलोड केले आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १ कोटी ३४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे वेगाने व्हायरल होत आहे.

आम्रपाली आणि निरहुआच्या या गाण्याचे नाव ‘होली में राजा आजा दोहा कतर से’ असे आहे. हे गाणे निरहुआ आणि प्रियांका सिंगने गायले आहे, तर या गाण्याचे लिरिक्स ओम झा यांनी लिहिले आहेत.

या गाण्याच्या व्हिडिओमध्ये निरहुआ एका ठिकाणी काम करताना दिसत आहे. तिथे त्याला आम्रपालीची आठवण होते. तो फोनवर गाणे गाताना आणि आपल्या मनाची स्थिती सांगताना दिसत आहे. दुसरीकडे आम्रपालीही आपल्या मनाची स्थिती सांगत आहे. गाण्यामध्ये दोघांचा एकत्र सीन खूप कमी आहे. परंतु तरीही या जोडीचा अंदाज चाहत्यांना आवडताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे गाणे सन २०१७ मधील आहे.

व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा-

https://bit.ly/3citKDF

आम्रपाली आणि निरहुआ या दोघांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. दोघेही लवकरच पुन्हा एकदा ‘घर परिवार’ चित्रपटात झळकताना दिसेल. निरहुआने सन २००५ मध्ये सलग ५ सुपरहिट चित्रपट दिले होते. आम्रपालीने ‘रहना है तेरी पलकों की छांव में’ चित्रपटात सुमनची भूमिका साकारली होती.

निरहुआची कारकीर्द
एकेकाळी सायकल चालवणारा निरहुआ आज करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्याचे गाव गाझीपूर हे आहे. तो भोजपुरी चित्रपटात येण्यापूर्वी गाणी गायचा. त्याला लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. परंतु त्याची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यावेळी त्याच्या वडिलांना महिन्याला ३,५०० रुपये मिळत असायचे. इतक्या कमी रुपयांमध्ये त्याचे वडील ७ व्यक्तींना सांभाळायचे, तो काळ त्यांच्यासाठी खूपच कठीण होता.

निरहुआ लहान असताना त्याचे वडील मोठ्या भावासोबत पैसे कमावण्यासाठी कोलकाताला गेले होते. परंतु त्यांनी आपली पत्नी आणि तीन मुलींना घरीच ठेवले होते. ते आपल्यासोबत केवळ निरहुआला घेऊन गेले होते. निरहुआचे सुरुवातीचे शिक्षण कोलकातामध्ये झाले होते. त्यावेळी निरहुआकडे पैसेही नसायचे. आज तो भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार बनला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १४’ रनरअप राहुल वैद्य लवकरच अडकणार लग्न बंधनात, चाहत्यांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

-क्या बात! नोरा फतेही बरोबर थिरकले चिमुकलीचे पाय, ‘दिलबर’ गाण्यावर केला अफलातून डान्स

-‘मिल्की’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके! गाण्यातील अदा पाहून चाहतेही झाले दंग

हे देखील वाचा