हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझ टिक टॉकवर? अभिनेत्याला ओळखण्यात चाहत्यांकडून चूक, पाहा व्हायरल व्हिडिओ

Hollywood Actor Tom Cruise Deepfake Tiktok Videos Viral On Social Media


जगामध्ये मिळते- जुळते चेहरे असणारे अनेक व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात. याला सेलिब्रिटीही अपवाद नाहीत. थेट विराट कोहलीपासून ते अजय देवगणपर्यंत अनेक सेलिब्रिटींप्रमाणेच हुबेहुब दिसणाऱ्या व्यक्तींचे फोटो अनेकदा व्हायरल झाले आहेत. अशातच आता हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रूझचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये टॉमला पाहून चाहत्यांनाही वाटले की, अभिनेत्याने टिक टॉक जॉईन केले की काय?, अन् चाहते चक्क त्याला फॉलोही करू लागले. खरं तर टॉम टिक टॉकवर नाहीये आणि हे सर्व व्हिडिओ डीपफेक आहेत.

डीपफेक व्हिडिओ पाहून चाहतेही गोंधळात पडले आणि त्यांनाही वाटले की टॉम टिक टॉकवर आहे. परंतु जसे चाहत्यांना खरं काय ते समजले, तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर सर्वांना जागरुक केले. एका युजरने ट्विटरवर टॉमचा हा व्हिडिओ शेअर केला आहे.

खरं तर सन २०२० मध्येही अनेक डीपफेक प्रकरणं समोर आली होती. डीपफेक व्हिडिओ म्हणजेच ज्यामध्ये कोणाच्याही बॉडीवर इतर व्यक्तीचा चेहरा लावणे. हा व्हिडिओ अशाप्रकारे एडिट केला जातो की, ज्यामुळे हा व्हिडिओ खरा आहे की खोटा हे समजत नाही. त्यामुळे चाहतेही हा व्हिडिओ पाहून टॉम खरंच टिक टॉकवर आल्याने खुश झाले होते.

टॉम हा असा अभिनेता आहे, ज्याने १०० मिलियन डॉलर्सपेक्षा अधिक कमाई करणारे दोन चित्रपट दिले आहेत. तो सध्या आपल्या आगामी ‘मिशन इम्पॉसिबल ७’ चित्रपटावर काम करत आहे. कोरोना व्हायरसमुळे चित्रपटाची शूटिंग यापूर्वीच बंद करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात झाली आहे.

टॉमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत ३ लग्न केले आहेत. त्यामध्ये मिमि रॉजर्स, निकोल किडमॅन आणि केटी होम्स यांचा समावेश आहे. आता टॉम एकटाच राहतो.

त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये ‘मिशन इम्पॉसिबल’, ‘टॉप गन’, ‘जॅक रिचर’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १४’ रनरअप राहुल वैद्य लवकरच अडकणार लग्न बंधनात, चाहत्यांच्या उत्सुकतेने गाठले शिखर

-क्या बात! नोरा फतेही बरोबर थिरकले चिमुकलीचे पाय, ‘दिलबर’ गाण्यावर केला अफलातून डान्स

-‘मिल्की’ गाण्यावर सपना चौधरीने लावले ठुमके! गाण्यातील अदा पाहून चाहतेही झाले दंग


Leave A Reply

Your email address will not be published.