२ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती. देशवासियांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. याच सुट्टीचे औचित्य साधून मनोरंजन क्षेत्रातालाही पैसा कमविण्याची एक मोठी संधी आहे. सरकारने सिनेमा गृहे अजूनही सुरु केली नाहीत. सर्वांना ती सुरु होण्याची प्रतिक्षा आहे. अशातच सिनेप्रेमी अनेक चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातूनच पाहतात.
या डिजीटल युगात मनोरंजनासाठी ओटीटीसह युट्यूब वगैरे प्लॅटफॉर्मला अच्छे दिन आले आहेत. याचाच फायदा घेत डिजीटल प्लॅटफॉर्मसही नवनवीन चित्रपट व वेबसिरीज प्रदर्शित करत आहेत. आता गांधी जयंतीचे औचित्य साधूनही ओटीटी प्लॅटफॉर्मवरच तब्बल ४ सिनेमे येत आहेत.
खाली पीली-
मकबूल खान या दिग्दर्शकाने बनवलेला खाली पीली हा एक ऍक्शन कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे. यात इशान खट्टर व अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसतील. हा चित्रपट चित्रपट गृहात प्रदर्शित होणार होता परंतू कोरोना व्हायरसमुळे तो होऊ शकला नाही. झी फ्लेक्सवर हा सिनेमा थेट टिव्हीच्या माध्यमातून दाखवला जाणार आहे. याचबरोबर ZEE5 ऍपवरही हा सिनेमा पाहता येणार आहे.
सिरीयस मॅन-
नवाजुद्दीन सिद्दीकी, श्वेता बसु प्रसाद, संजय नार्वेकर आणि नासर हे मुख्य भूमिका करत असलेले सिरीयस मॅन हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. ही एक गरिबीमुळे वैतागलेल्या पित्याची कहानी आहे. तो या सिनेमात आपल्या मुलाला जगासमोर एक जिनीयस अर्थात हुशार मुलगा म्हणून दाखविण्यासाठी घेत असलेले कष्ट दाखवले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन सुधीर मिश्रा यांनी केले आहे. हा चित्रपट मनु जोसेफ यांच्या पुस्तकावर आधारीत आहे.
बहुत हुआ सन्मान-
काही महिन्यांपुर्वीच तयार झालेला परंतू प्रदर्शित न झालेला बहुत हुआ सन्मान चित्रपट लवकरच डिज्नी प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होत आहे. गेल्या बुधवारी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. हा एक कॉमेडी ड्रामा वर्गातील चित्रपट आहे. यात राघव जुयाल, अभिषेक चौहान, संजय मिश्रा, निधि सिंह आणि राम कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. आशिष शुक्ला यांनी याचे दिग्दर्शन केले आहे. दोन मुलं बँक लुटण्याचा प्रयत्न करतात व त्यानंतर झालेला गोंधळ यात चित्रित करण्यात आला आहे.
निशब्दम-
आर माधवन, अनुष्का शेट्टी, अंजलि आणि शालिनी पांडेसारख्या सिताऱ्यांना घेऊन तयार केलेला निशब्दम हा मुळ तामिळी सिनेमा आहे. हा सिनेमा तेलुगू व मल्याळम भाषेतही आज प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे हेमंत मधुकर यांनी केले आहे. हा एक ड्रामा थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट वर्षाच्या सुरुवातीच्याच महिन्यांत प्रदर्शित होणार होता. परंतू काम पुर्ण न झाल्यामुळे २ एप्रिल पर्यंत हा सिनेमा पुढे ढकलला होता. परंतू लॉकडाऊनमुळे अखेर हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येत आहे. हा सिनेमा ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.