Saturday, July 27, 2024

दमदार होणार नवीन वर्षाची सुरुवात! प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालेत ‘हे’ चित्रपट, यादी आली समोर

कोरोना महामारीमुळे जवळपास दीड वर्षे नाट्यगृह, तसेच सिनेमागृह बंद होते. लॉकडाऊननंतर आता बऱ्याच दिवसांनी सिनेमागृह उघडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, चित्रपटगृहे खुली झाल्यापासून, एकापेक्षा एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. तर दुसरीकडे अनेक चित्रपट रिलीझ व्हायला सज्ज झाली आहेत. काही आगामी चित्रपटांच्या तारखा देखील जाहीर केल्या गेल्या आहेत. ‘सूर्यवंशी’ चित्रपटानंतर अनेक चित्रपट रिलीझ होण्यासाठी रांगेत आहेत.

सलमान खानचा ‘अंतिम’ चित्रपट बॉक्सऑफिसवर सरासरी कामगिरी करत आहे. डिसेंबर महिन्यात अनेक मोठ-मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यामधील रणवीर सिंगचा ‘८३’ आणि आयुष्मान खुरानाचा ‘चंदिगड करे आशिकी’ हे चित्रपट चांगलेच चर्चेत आहेत. शिवाय ‘तडप’ ३ डिसेंबरला रिलीझ होत आहे, तर १० डिसेंबरला ‘चंडीगड करे अशिकी’सोबत ‘वेल्ले’ आणि ‘कोड नेम अब्दुल’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. ख्रिसमसच्या दिनी ‘८३’, तर २४ डिसेंबरला शाहिद कपूरची ‘जर्सी रिलीझ होईल. ( movies release dates check out the list of films that will hit the theaters by 2023)

२०२२ मध्ये रिलीझ होणारे चित्रपट
ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्वीटद्वारे २०२३ पर्यंत रिलीझ होणाऱ्या चित्रपटांच्या तारखांबद्दल सांगितले आहे. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये ‘आरआरआर’ (७ जानेवारी), ‘राधे श्याम’ (१४ जानेवारी), ‘पृथ्वीराज’ (२१ जानेवारी), ‘अटॅक’ (२६ जानेवारी) आणि ‘द कश्मीर फाइल्स’ (२६ जानेवारी) हे चित्रपट रिलीझ होणार आहेत.

पुढे फेब्रुवारी २०२२ मध्ये, ‘बधाई दो’ (४ फेब्रुवारी), ‘गंगुबाई काठीयावाडी’ (१८ फेब्रुवारी), ‘जयेशभाई जोरदार’ ( २५ फेब्रुवारी), हे चित्रपट रिलीझ होणार आहेत. मार्च २०२२ मध्ये ‘बच्चन पांडे’ (४ मार्च), शमशेरा (१८ मार्च), ‘भूल भुलैया २’ (२५ मार्च), ‘अनेक'( ३१ मार्च) रिलीझ होतील. तर एप्रिल २०२२ मध्ये आमिर खानचा चित्रपट ‘लाल सिंग चड्डा’ आणि ‘केजीएफ २’ बॉक्स ऑफिसवर एकमेकांना जोरदार टक्कर देतील. सोबतच अजय देवगणचा ‘मेडे’ आणि टायगर श्रॉफचा ‘हिरोपंती २’ ईदच्या दिवशी एकमेकांशी स्पर्धा करतील, शिवाय कंगना रणौत हिचा ‘धाकड’ही ८ एप्रिलला सिनेमागृहामध्ये दाखल होणार आहे.

२०२३ मध्ये रिलीझ होणारे चित्रपट
साल २०२३ मध्ये हृतिक रोशनचा ‘फायटर’ २६ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत चित्रपटदेखील प्रजासत्ताक दिनी प्रदर्शित करण्यात येईल. २०२३ मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘बुल’ (७ एप्रिल) आणि
‘ऍनिमल’ (११ ऑगस्ट) यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Birthday: लग्नाआधी लिव्ह-इनमध्ये होती नेहा पेंडसे, तर दोन मुलींचा पिता आहे अभिनेत्रीचा पती

-टॅटूची शौकीन आहे व्हीजे बानी, ‘रोडीज’चे अनेक सीझन होस्ट करून बनलीय तरुणांच्या गळ्यातील ताईत

-दुःखद! कोरिओग्राफर शिवा शंकर यांचे निधन, बराच काळ चालू होता कोरोनाशी लढा

हे देखील वाचा