Friday, July 5, 2024

राजपालच्या ‘अर्ध’पूर्वी ‘या’ चित्रपटांमध्ये दाखवलीय किन्नरची कहाणी, आशुतोष राणांच्या भूमिकेने तर थरथर कापेल अंग

जुन्या काळातील चित्रपटांमध्ये, किन्नर एकतर मजेदार स्थितीसाठी किंवा केवळ विनोदांसाठी वापरले जायचे. जसजसा काळ बदलत गेला, तसतसा कथेत बदल होत गेला आणि मग किन्नर चित्रपटांमध्ये अशा भूमिकेत दिसल्या, की कदाचित त्यांच्याशिवाय चित्रपट पूर्ण होऊ शकला नसता. पूर्वीच्या काळी अभिनेते अशी पात्रे साकारायला खूप संकोच करत असत. पण नंतर आशुतोष राणा आणि परेश रावल सारख्या अभिनेत्यांनी किन्नरच्या भूमिकेत दमदार अभिनय करून चित्रपटांमध्ये पात्र जिवंत करून दाखवले.

यानंतर इतर कलाकारांनीही अशा भूमिका करायला सुरुवात केली. राजपाल यादवच्या (Rajpal Yadav) ‘अर्ध’ या चित्रपटात एका अशा व्यक्तीची कथा आहे, ज्याला मुंबईत उदरनिर्वाहासाठी पुरुषाकडून किन्नर बनण्यास भाग पाडले जाते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, जे मुख्यतः किन्नरच्या व्यक्तिरेखेवर आधारित आहेत. (movies that represents the lives of a transgender)

तमन्ना
या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी एका किन्नरची भूमिका साकारली होती. या चित्रपटात किन्नरचे जीवन सकारात्मक पद्धतीने दाखवण्यात आले आहे. या चित्रपटात परेश रावल किन्नर टिक्कूच्या भूमिकेत होते. एका सामाजिक समस्येवर आधारित या चित्रपटाला त्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

शबनम मौसी
साल 2005 आलेला हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित होता. या चित्रपटात आशुतोष राणा (Ashutosh Rana) यांनी शबनम मौसीची भूमिका साकारली होती. शबनम मौसी १९९८ ते २००३ दरम्यान मध्य प्रदेश राज्य विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्य होत्या. सार्वजनिक पदावर निवडून आलेल्या त्या पहिल्या किन्नर भारतीय आहे.

संघर्ष
या चित्रपटातही आशुतोष राणाने एका किन्नरची भूमिका केली होती, ज्याला मुलांचा बळी देऊन अमर व्हायचे आहे. लज्जा शंकर पांडे यांची किंकाळी आणि जीभ वळवणारा आवाज थिएटरमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना थक्क करून गेला. या चित्रपटासाठी आशुतोष राणा यांना सर्वोत्कृष्ट खलनायकाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

लक्ष्मी
अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘लक्ष्मी’ हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय शरद केळकरही (Sharad Kelkar) ट्रान्सजेंडरच्या भूमिकेत दिसला होता. हा एक हॉरर चित्रपट होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रश्मिका मंदाना तिच्या चाहत्यांवर नाराज;पोस्ट शेअर करत म्हणाली, ‘पंचिंग बॅग…’

The Kashmir Files | पाकिस्तान आणि चीनमुळे विवेक अग्निहोत्रींनी बंद केलं ट्विटर अकाउंट? वाचा संपूर्ण प्रकरण

हे देखील वाचा