Friday, July 5, 2024

Mrs India World | कोण आहे सरगम ​​कौशल? जिने पटकावलंय ‘मिसेस इंडिया वर्ल्ड २०२२-२३चं’ विजेतेपद

‘मिसेस इंडिया वर्ल्ड २०२२-२०२३’च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. भारताच्या सरगम ​​कौशलने (Sargam Koushal) यंदा मिसेस इंडिया वर्ल्डचा किताब पटकावला आहे. ज्युरी पॅनल सोहा अली खान (Soha Ali Khan), विवेक ओबेरॉय (Vivek Oberoy), मोहम्मद अझरुद्दीन, डिझायनर मासूम मेवावाला आणि माजी मिसेस वर्ल्ड अदिती गोवित्रीकर यांनी या टायटलसाठी ५१ स्पर्धकांमधून सरगम ​​कौशलची निवड केली आहे.

मिसेस इंडिया वर्ल्ड झाल्यानंतर पुढची पायरी काय असेल?
मिसेस इंडिया वर्ल्ड २०२१ आणि मिसेस वर्ल्ड २०२२ मध्ये राष्ट्रीय वेशभूषा विजेत्या नवदीप कौर यांनी सरगम ​​कौशलला मुकुट घातला. मिसेस इंडिया वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर आता सरगम ​​कौशल मिसेस वर्ल्ड २०२२ मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. (mrs india world 2022 2023 sargam kaushal wins title)

कोण आहे सरगम ​​कौशल?
सरगम कौशलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे की, तिचा पती भारतीय नौदलात काम करतो. तसेच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ती शिक्षिका होती. सरगम कौशल हिने इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा