Saturday, June 29, 2024

एम.एस. धोनी चित्रपटातील छोटा धोनी आठवतो का? झालाय एवढा हॅण्डसम की ओळखणे देखील झाले कठीण

अनेक कलाकारांच्या, राजकीय नेत्यांच्या आणि क्रिकेटरच्या आयुष्यावर बायोपीक आलेल्या आपण पाहतो. काहींना त्या आवडतात तर काहींना आवडत नाही. परंतु एम.एस. धोनीच्या बायोपीकने काही कमालच केली. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत बाकी अनेक कलाकारांनी या चित्रपटात शानदार अभिनय केला. नीरज पांडे यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता.

या चित्रपटात महेंद्र सिंग धोनीचे बालपण तसेच तरुणपण दोन्ही दाखवले होते. तरुणपणात हे पात्र सुशांत सिंगने निभावले होते. तसेच शाळेच्या दिवसातील महेंद्र सिंगचे पात्र अभिनेता जिशान नदफ याने निभावले होते. त्याचा अभिनय देखील अनेकांना खूप आवडला होता. त्याचे खूप कौतुक झाले होते. परंतु हा जिशान आता चांगलाच मोठा झाला आहे आणि तो आता खूपच हॅण्डसम दिसत आहे.

जिशानचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा हा फोटो पाहून त्याला ओळखणे देखील कठीण झाले आहे. अनेकजण त्याचा हा फोटो पाहून हैराण झाले आहेत. चाहते त्याच्या या फोटोवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. जिशान अनेक टीव्ही कमर्शिअलमध्ये दिसला आहे. आता त्या हॅण्डसम रुपात पाहून सगळ्यांना ओळखणे अवघड झाले आहे की, हा तोच लहान मुलगा आहे. सध्या तो त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.

एम.एस. धोनी या चित्रपटाने सुशांत सिंग राजपूतच्या करीअला मोठे वळण मिळाले होते. या चित्रपटाने त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. त्याचे पात्र देखील अनेकांना आवडले होते. सर्वत्र त्याचे कौतुक झाले होते. चित्रपटात त्याच्यासोबत कियारा आडवाणी, दिशा पटानी, अनुपम खेर हे कलाकार होते.

हेही वाचा :

हे देखील वाचा