Thursday, June 13, 2024

क्या बात है! धोनीची पत्नी आहे 41 वर्षीय अभिनेत्याची Fan, पाहिलेत आतापर्यंतचे सगळे सिनेमे

भारतीय संघाचा महान कर्णधार एमएस धोनी आणि पत्नी साक्षी धोनी यांनी आता सिनेसृष्टीत पाऊल ठेवले आहे. जोडप्याने प्रॉडक्शनच्या दुनियेत पदार्पण केले आहे. ‘धोनी एंटरटेन्मेंट’ या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. नुकतेच या सिनेमाशी संबंधित एका कार्यक्रमात साक्षीने साऊथ सिनेमांविषयीच्या आपल्या आवडीबद्दल सांगितले. यावेळी तिने तिचा आवडता साऊथ अभिनेता कोण आहे, हेही सांगितले.

साक्षी धोनी (Sakshi Dhoni) हिला सिनेमा पाहण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळेच तिने जेव्हा व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिने सर्वप्रथम सिनेसृष्टी निवडली. तिने एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासोबत मिळून आपले ‘धोनी एंटरटेन्मेंट’ प्रॉडक्शन हाऊस सुरू केले.

साक्षी धोनीचा जन्म 19 नोव्हेंबर, 1988 रोजी आसाम येथे झाला आहे. तसेच, तिने धोनीसोबत 2010मध्ये संसार थाटला होता. आता साक्षीने सिनेजगतातही पाऊल ठेवले आहे. तिच्या प्रॉडक्शनमध्ये बनलेला रोमँटिक सिनेमा ‘लेट्स गेट मॅरिड‘ (Lets Get Married) येत्या 4 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

साक्षीचा साऊथचा आवडता अभिनेता
एका कार्यक्रमात नुकतेच साक्षीने सिनेमाविषयी माहिती दिली. यावेळी साक्षीने तिचा साऊथचा आवडता अभिनेता कोण आहे, याविषयीदेखील सांगितले. साक्षीने सांगितले की, 41 वर्षीय अल्लू अर्जुन (Allu Arjun) तिचा आवडता अभिनेता आहे. तिला अल्लूचा अभिनय खूप आवडतो. साक्षीने असेही सांगितले की, तिने अल्लूचे आतापर्यंतचे सर्व हिंदी डब सिनेमे युट्यूबवर पाहिले आहेत. तसेच, ती त्याची चाहती आहे आणि त्याच्या ‘पुष्पा’ सिनेमाने तिला खूपच इम्प्रेस केले होते.

कोट्यवधी चाहत्यांप्रमाणे साक्षीदेखील अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) सिनेमाची वाट पाहत आहे. खरं तर, नुकतेच साऊथच्या बहुप्रतिक्षित सिनेमांच्या यादीत अल्लूचा ‘पुष्पा 2’ हा अव्वलस्थानी आहे. मागील काही दिवसांपूर्वी अल्लूने ‘पुष्पा 2’मधील एक डायलॉगही बोलला होता. हा सिनेमा 2024मध्ये रिलीज होणार असून चाहत्यांची या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. (ms dhoni wife sakshi diehard this tollywood actor fan)

महत्त्वाच्या बातम्या-
ओपेनहायमर आणि ‘भगवद गीता’ वादावर ‘श्री कृष्णा’ची प्रतिक्रिया, काय म्हणाले वाचाच
लक्ष्मीकांत बेर्डे, वर्षा उसगांवकर यांच्यासोबत काम करणारी ”ही” अभिनेत्री आठवते का? जाणून घ्या ‘ती’ सध्या काय करते?

हे देखील वाचा