Monday, April 15, 2024

रिहानाबाबत ओरीचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘जामनगरमध्ये भेटण्यापूर्वी ती कोण आहे मला माहीत नव्हते’

ऑरीला बॉलिवूडमध्ये कोणत्याही ओळखीची गरज नाही. ऑरीने एकाही चित्रपटात काम न करता बॉलिवूडमध्ये प्रचंड फॅन फॉलोइंग निर्माण केले आहे. अलीकडेच ऑरी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सेलिब्रेशनलाही पोहोचला होता जिथे तो पॉप स्टार रिहानाला भेटला आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता ऑरीने त्याच्या आणि रिहानाच्या भेटीशी संबंधित अनेक रंजक खुलासे मीडियासमोर केले आहेत.

शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खानपासून ते फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग आणि रिहाना, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग सेलिब्रेशनला सगळ्यांनी हजेरी लावली होती. ऑरी देखील या समारंभात आलेला होता. नुकतेच जेव्हा त्याला विचारण्यात आले की, रिहानाला भेटून कसे वाटले. या प्रश्नाच्या उत्तरात ऑरी म्हणाला की ‘तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही, पण जामनगरमध्ये रिहाना भेटण्यापूर्वी ती कोण होती हे मला माहीत नव्हते.”

ऑरी अनेकदा त्याच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे चर्चेत असतो. ऑरीने पुढे स्पष्ट केले की, “मी हा विषय आता उघड करू नये, पण तो माझ्या मार्केटिंगचा भाग आहे. भविष्यात, मला माझ्यासाठी एक संग्रहालय तयार करायचे आहे जिथे मला आवडणाऱ्या सर्व गोष्टी एकत्र येतील. मी माझ्या पोशाखाबद्दल खूप जागरूक आहे कारण मला ते ब्रँड म्हणून स्थापित करायचे आहे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘सॅम बहादूर’ आणि ‘ॲनिमल’च्या बॉक्स ऑफिस क्लॅशवर विकीने मौन तोडले; म्हणाला, आमचा चित्रपट…’
जेलमध्ये हलवा-पुरी देऊन एल्विशचं स्वागत! युजर्स म्हणाले, ‘सिस्टम’ तिथेही चालू आहे’

हे देखील वाचा