Saturday, July 27, 2024

सिनेइंडस्ट्रीला आणखी एक धक्का, रितेश देशमुखच्या सिनेमाचे निर्माते मुकेश उदेशी यांचं निधन

मनोरंजन विश्वातून एक काळीज तोडणारी बातमी समोर आली आहे. दर्जेदार सिनेमांची निर्माती करणारा माणुस काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ‘गो गोवा गॉन’ आणि ‘एक व्हिलन’ या चित्रपटांचे निर्माते मुकेश उदेशी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. ही बातमी ऐकून संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला आहे. मुकेश यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक उत्तमोत्तम बॉलिवूड चित्रपटांची निर्मितीही केली. ज्यामध्ये ‘द विलेन’ आणि ‘कलकत्ता मेल’चा समावेश आहे.

निर्मात्याच्या निधनाची बातमी समोर आल्यापासून सोशल मीडियावर प्रत्येकजण निर्मात्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना दिसत आहे. या बातमीने बी-टाऊनच्या सेलिब्रिटींसोबतच त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. मुकेश उदेशी (Mukesh Udeshi)यांच्या निधनामुळे बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश उदेशी यांनी सोमवारी रात्री (11 सप्टेंबर ) अखेरचा श्वास घेतला आहे.

मुकेश उदेशी हे राम गोपाल वर्माच्या ‘कौन’चे सह-निर्माते देखील होते. या चित्रपटात उर्मिला मातोंडकर आणि मनोज बाजपेयी यांनी आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली. याशिवाय त्यांनी अल्लू अरविंद यांच्या चिरंजीवी अभिनीत चित्रपटांची निर्मितीही केली आहे. त्यांना परदेशात चित्रपट निर्मिती आणि चित्रीकरणाचा 37 वर्षांचा अनुभव होता. मुकेश यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकले नाहीत, मात्र प्रेक्षकांच्या हृदयात कायमचे स्थान करून राहिले.

दिवंगत निर्माते मुकेश यांच्याबद्दल बोलताना, ज्येष्ठ निर्माते आणि त्यांचे जवळचे मित्र प्रवेश सिप्पी म्हणाले, “ते चेन्नईमध्ये किडनी प्रत्यारोपणाची तयारी करत होते, तिथे अल्लू अरविंद त्यांची काळजी घेत होते. पण ऑपरेशनच्या काही दिवस आधी त्यांचे निधन झाले.” मुकेश उदेशी हे मॉरिशसमध्ये चित्रित झालेल्या बहुतेक बॉलीवूड चित्रपटांचे लाइन प्रोड्युसर देखील आहेत. (Mukesh Udeshi the producer of Ritesh Deshmukh film passed away)

अधिक वाचा-
पंडितांच्या घरात जन्माला येणार मुस्लिम बाळ? विकी कौशलच्या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ
शाहरुख खानच्या ‘जवान’वर अभिनेत्री भूमी पेडणेकर फिदा; म्हणाली, ‘हा माणूस…’

हे देखील वाचा