Monday, July 1, 2024

बॉलिवूडला मोठा धक्का! ‘जाने भी दो यारों’ चित्रपटाला संगीत देणारे वनराज भाटिया यांचे निधन, करत होते आर्थिक संकटाचा सामना

चित्रपटसृष्टीतून एकापाठोपाठ एक दु:खद बातम्या येत आहेत. अनेक दिग्गज कलाकार मंडळी जगाचा निरोप घेताना दिसत आहेत. अशातच आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे. दिग्गज संगीत दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते वनराज भाटिया यांचे शुक्रवारी (७ मे) निधन झाले आहे. ते ९३ वर्षांचे होते. ते काही काळ वयाशी संबंधित आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

कलाकारांनी ट्वीट करत वाहिली श्रद्धांजली

अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता फरहान अख्तरने ट्वीट करत वनराज भाटिया यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने लिहिले की, “तुमच्या आत्म्यास शांती लाभो वनराज भाटिया. तुमच्या सर्व अप्रतिम संगीतांच्या रचनांमध्ये तुम्ही बनवलेली तमसची थीम मला फार भावली. या थीमच्या सुरुवातीलाच यातनेने भरलेल्या संगीताची भर घातली होती, जी ऐकून कोणाच्याही अंगावर शहारे येतील. ज्यामुळे कोणाचेही हृद्य तुटेल.”

यानंतर केंद्रीय मंत्री स्म्रिती इराणी यांनीही ट्वीट करत लिहिले की, “वनराज भाटिया यांच्या निधनाची बातमी ऐकून धक्का बसला. वागले की दुनिया, जाने भी दो यारों, त्यांनी अशा असंख्य आठवणी मागे सोडल्या. माझ्या संवेदना त्यांच्या प्रिय व्यक्ती आणि चाहत्यांसोबत आहेत. ओम शांती

काही काळापूर्वी वनराज आर्थिक संकटाचा सामना करत होते. त्यांनी याचा सामना करण्यासाठी चक्क आपल्या घरातील वस्तूही विकण्यासाठी काढल्या होत्या. विशेष म्हणजे ते अविवाहित होते आणि दक्षिण मुंबईतील घरात एकटेच राहायचे.

वनराज भाटिया यांचा जन्म मुंबईत सन १९२७ मध्ये झाला होता. त्यांनी रॉयल अकॅडमी ऑफ म्युझिक लंडन एँड पॅरिस कन्झर्वेटरीमधून शिक्षण घेतले होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जाहिरातींमध्ये जिंगल्स कंपोजर म्हणून केली होती. त्यांनी तब्बल ७००० जिंगल्सला संगीत दिले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी शाम बेनेगल दिग्दर्शित चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यांनी बर्‍याच चित्रपटांचे बॅकग्राऊंड स्कोअर कंपोज केले आहेत. तसेच त्यांनी बर्‍याच लोकप्रिय टेलिव्हिजन शोसाठी शीर्षकांची रचना केली आहे.

त्यांनी आतापर्यंत ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘जाने भी दो यारों’, ‘३६ चौरंगी लेन‘, ‘द्रोह काल और जुनून’ यांसारख्या चित्रपटांना संगीत दिले आहे. तत्यांनी ‘तमस’ या शोसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. सन २०१२ साली त्यांनी पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक

-चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री करतेय शेती, पाहा आंब्याच्या बागेतील जुही चावलाचे व्हायरल फोटो

-दिवंगत अभिनेता सुशांतच्या जीवनावरून शाळेतील मुलं शिकणार कुटुंबाचे महत्त्व, अभिनेत्याचा फोटोचा पुस्तकात समावेश

हे देखील वाचा