Monday, February 26, 2024

मुस्लिम असुनही पुजा-पाटावर विश्वास ठेवतात हे सेलिब्रिटी, चित्रपट रिलीज होण्याआधी जातात मंदिरात

बाॅलिवूडच्या सुपरस्टारपासुन ते सामान्य माणसांपर्यंत सध्याला सगळेच सोशल मिडियाचा वापर करतात. सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्याशी निगडीत प्रत्येक गोष्टीचे अपडेट किंवा छोट्या-मोठ्या बातम्या सोशल मिडियावरुनंच शेअर करतात. आजच्या लेखातुन त्याच सेलिब्रिटींमधील काही अशा सेलिब्रिटींबद्दल जाणुन घेणार आहोत ज्यांचा धर्म तर मुस्लिम आहे परंतु ते पुजा-पाठावर प्रचंड विश्वास ठेवतात. त्यासोबतंच ते मंदिरातही जातात.

सारा अली खान(Sara Ali Khan)
बाॅलिवूडमधील तरुण अभिनेत्री सारा अली खान तिच्या प्रोफेशनल लाइफ व्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टींसाठीही नेहमीच चर्चेत असते. परंतु तुम्हाला माहिती आहे का ? सारा अली खानचा पुजा-पाठावर प्रचंड विश्वास आहे. इतकेच नाही तर ती महादेवाची खुप मोठी भक्त आहे. साराने याआधी केदारनाथ, बद्रीनाथपासुन ते महाकालेश्वर मंदिरापर्यंत अशा अनेक मंदिरांमध्ये जावुन भोलेनाथाचं दर्शन घेतलं आहे. असं जरी असलं तरी तिच्या या देवावरील आस्थेमुळे तिला अनेकदा नेटीझन्सनी प्रचंड ट्रोलदेखील केलं आहे.

सलमान खान( Salman Khan)
बाॅलिवूडचं दबंग व्यक्तिमत्व आणि आपल्या सर्वांचा आवडता भाईजान सलमान खानचं नावाचादेखील या यादीत समावेश आहे. सलमान खान गणपती बाप्पाचा खुप मोठा भक्त आहे. त्याची बाप्पावर खुप श्रद्धा आहे. मुस्लिम असुनही सलमान खान गणेश चतुर्थीला त्याच्या घरात गणपती बाप्पाची स्थापना करतो.

शाहरुख खान(Shah Rukh Khan)
बाॅलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानलाही आपण अनेक वेळी मंदिरात जाताना पाहिलं आहे. अभिनेत्याला मध्यंतरी डंकी चित्रपटाच्या रिलीज डेट आधी त्याची मुलगी सुहाना खान सोबत शिर्डीच्या मंदिरात दर्शन घेताना पाहिलं होतं. त्यासोबतंच शाहरुख खान त्याचे चित्रपट रिलीज होण्यापुर्वी माता वैष्णो देवीच्या दर्शनासाठी नक्की जातो. परंतू प्रचंड चाहतावर्ग असल्याने शाहरुख खान चेहरा लपवुन वैष्णो देवीच्या दर्शनाला जातो.

कैटरीना कैफ(Kaitrina Kaif)
अभिनेत्री कैटरीना कैफ आणि विकी कौशलचं मध्यंतरी लग्न झालं. लग्नानंतर जरी कैटरिना विकीसोबत अनेक वेळा मंदिरात जाताना दिसली अशली तरी अभिनेत्री लग्नाआधीही तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनापुर्वी मंदीरात जायची. इतकंच नाही तर अभिनेत्री प्रत्येक हिंदु समदेखील प्रचंड उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा करते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

पत्रकार बनुन भुमी पेडणेकरने उतरवला समाजातील ‘भक्षका’चा मुखवटा,म्हणाली,’ या गोष्टी आयुष्याचा भाग… ‘
छोट्या पडद्यावरील ‘या ‘अभिनेत्री मुकल्या बिगबाॅसच्या विजेतेपदाला, पाहा कोणाचा आहे समावेश

हे देखील वाचा