Monday, October 14, 2024
Home टेलिव्हिजन छोट्या पडद्यावरील ‘या ‘अभिनेत्री मुकल्या बिगबाॅसच्या विजेतेपदाला, पाहा कोणाचा आहे समावेश

छोट्या पडद्यावरील ‘या ‘अभिनेत्री मुकल्या बिगबाॅसच्या विजेतेपदाला, पाहा कोणाचा आहे समावेश

टेलिविजनचा सर्वात हिट रियालिटी शो ‘बिग बाॅस 17′(BigBoss 17) चा महाअंतिम सोहळा मागच्याच आठवड्यात पार पडला. या सिझनमध्ये टेलिविजनवरील अनेक दिग्गज अभिनेत्रीही स्पर्धक म्हणुन आल्या होत्या. टीवीवरचं सर्वात गाजलेलं नाव म्हणजे अंकिता लोखंडे, तीदेखील ‘बिग बाॅस’च्या या सिझनचा भाग होती. प्रेक्षकांना वाट होतं की अंकिताच या सिझनची विजेता होईल परंतु शोच्या अंतिम टप्प्यात मात्र प्रेक्षकांचा अपेक्षाभंग झाला. महाअंतिम सोहळ्यात अंतिम 4 स्पर्धकांमध्ये जाऊनही अंकिताला ट्राॅफी तिच्या नावावर करता आली नाही. स्टँडअप काॅमेडियन मुनावर फारूकीने या सिझनची ट्राॅफी जिंकत बिगबाॅस विजेत्यांच्या यादीमध्ये स्वतःचं नाव लिहिलं. या गोष्टीने प्रेक्षकांना चकित केले.मात्र बिगबाॅसच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडलंय असं नाही. आज तुम्हाला टीवीवरच्या अशा प्रसिद्ध अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्या बिगबाॅसचा भाग होत्या. त्यांनी शोमध्ये प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजनही केलं परंतु बिगबाॅसच्या ट्राॅफीला मात्र मुकल्या.

अंकिता लोखंडे
बिगबाॅस 17 मध्ये अंकिता(Ankita Lokhande) स्पर्धक म्हणुन आली होती. तिने वेगवेगळ्या पद्धतीने चाहत्यांचे मनोरंजनही केले. इतकंच नाही तर बिगबाॅस 17 च्या विजेत्यांच्या प्रबळ दावेदारांमध्येही तिचं नाव होतं. फक्त प्रेक्षकांनाच नव्हे तर शोच्या होस्टला सुद्धा असं वाटत होतं की अंकिता विजेता होण्याची शक्यता आहे. परंतु ही गोष्ट खरी ठरली नाही. टेलिविजनच्या सर्वांत आवडत्या सुनांमधील एक आणि मजबूत फॅनबेस असणारी अंकिता लोखंडे. हे सर्व असुनही बिगबाॅसचा शो हारली.

निम्रत कौर आलुवालिया (nimrata kaur Aalhuvaliya)
‘छोटी सरदारनी’च्या नावाने प्रसिद्ध असणारी. टेलिविजनची सुंदर अभीनेत्री निम्रत कौर आलुवालियाचंही नाव या यादीत शामिल आहे. निम्रत ‘बिग बाॅस 16’मध्ये स्पर्धक म्हणुन आली होती. प्रेक्षकांना तेव्हाही असं वाटत होतं की, ती नक्कीच शो जिंकणार.परंतू तेव्हाही तसं झालं नाही.याउलट निम्रत तर बिग बाॅस 16च्या टाॅप पाच स्पर्धकांमध्येही पोहोचु शकली नाही.

रश्मी देसाई
रश्मी देसाई (rashmi desai)टेलिविजनवरील प्रसिद्ध नावांमधील एक आहे. तिने ‘उतरन’ या मालिकेत ‘तपस्या’ हेे पात्र साकारलं होतं. याच पात्रामुळे तिला टेलिविजन वर एक नवी ओळख मिळाली होती. तिच्या मजबुत चाहत्या वर्गासोबत तिने बिगबाॅस 15 च्या घरात प्रवेश केला होता.परंतू ती देखील हो शो जिंकु शकली नाही.सिद्धार्थ शुक्ला त्या सिझनचा विजेता झाला होता.

देवोलिना भट्टाचार्जी
टेलिविजनच्या दुनियेत देवोलिना भट्टाचार्जी(deolina bhttacharji) ‘गोपी बहु ‘च्या नावाने प्रसिद्ध आहे. जेव्हा देवोलिना भट्टाचार्जी ‘बिगबाॅस ‘चा भाग बनली होती तेव्हा लोकामना असं वाटत होतं की, हा सिझन देवोलिनाच जिंकणार, परंतु ती शोच्या टाॅप पाच स्पर्धकांमध्येही पोहोचु शकली नव्हती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

सुशांत आणि अंकिताच्या नात्यावर विकी जैनची प्रतिक्रिया,म्हणाला,’त्यामुळे मी असुरक्षित वाटुन…’
रणदिप हुड्डा वेगळ्या पद्धतीने देणार शहीदांना श्रद्धांजली,शहीद दिवशी रिलीज होणार ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा