‘पुष्पा‘ चित्रपटातील ‘सामी सामी’ हे गाणे सध्या जोरदार चर्चेत आहे. सोशल मीडियावर या गाण्याची क्रेझ आली आहे. अनेकजण या गाण्यावर त्यांच्या व्हिडिओ तयार केल्या आहेत. अशातच ‘माझी तुझी रेशीमगाठ‘ मालिकेतील काही कलाकारांनी या गाण्यावर व्हिडिओ तयार केला आहे. मालिकेतील परीने म्हणजेच मायरा वैकुळने या गाण्यावर व्हिडिओ तयार केला आहे.
मायरच्या (myra vaikul) अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ समोर आला आहे. या मालिकेतील बाकी दोन स्त्री पात्राता असणाऱ्या सहाय्यक अभिनेत्री तिच्यासोबत डान्स करत आहेत. या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी आतापर्यंत डान्स केल्या आहेत. ‘सामी सामी’ या गाण्यावर दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने अप्रतिम डान्स केला आहे. तिच्या या डान्सवरील स्टेप्स अनेकजण फॉलो करत आहेत. (Myra vaikul’s Sami Sami dance video viral on social media)
परीने शेअर केलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. एवढ्या कमी वयातच तिने तिचा वेगळा आणि खास असा चाहता वर्ग तयार केला आहे. तिचा अभिनय सगळ्यांना खूप आवडतो.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे मुख्य भूमिकेत आहेत. त्या दोघांनी ही बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवर पदार्पण केले आहे. त्यांची जोडी देखील अनेकांना आवडत आहे. त्यांच्या या मालिकेला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे.
हेही वाचा :