Thursday, April 25, 2024

किरण माने प्रकरणावर समिर विद्वंस यांनी केले मत व्यक्त, सोशल मीडियावरील ट्विट ठरतंय लक्षवेधी

स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो‘ या मालिकेत अभिनेता किरण माने याला मालिकेतून बाहेर काढण्यात आले आहे. किरण माने हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. समाजातील विविध गोष्टींवर तो त्याचे मत परखडपणे मांडत असतो. अशातच त्याने राजकारणावर त्याचे मत व्यक्त केल्याने त्याला मालिकेतून काढण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर आता संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकजण निर्मात्यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. अशातच दिग्दर्शक समीर विद्वंस यांनी या प्रकरणावर त्यांचे मत व्यक्त केले आहेत.

यांनी केलेले ट्वीट लक्षवेधी ठरतंय. त्यांनी ट्विट केले आहे की, ” कोणतीही राजकीय भुमिका घेणं/व्यक्त होणं ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. घटनादत्त अधिकार आहे. मत न पटल्यास वैचारिक विरोध होऊच शकतो. पण हक्काचं काम काढून घेणं ही दडपशाही आहे! किरण मानेचं व्यक्त होणं न पटून किंवा तक्रारींवरून त्याला मालिकेतून काढून टाकलं असेल तर हे अन्यायकारकच आहे.” त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर सध्या चर्चेत ठरत आहे.

किरण माने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत माऊच्या वडिलांचे पात्र निभावत आहेत. त्यांचे बेधडक आणि बिनधास्त पात्र सगळ्यांना खूप आवडत होते. परंतु आता त्यांना या मालिकेतून बाहेर काढल्यामुळे सर्वत्र सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या केवळ चाहत्यांनी नाही तर अनेक कलाकारांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा