लज्जास्पद! ‘नागिन’ फेम अभिनेता पर्ल पुरीला अटक; अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप

Naagin 3 actor pearl v puri arrest for alleged rape and molestation


टेलिव्हिजनवरील ‘नागिन’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे पर्ल वी पुरी. तो या दिवसात खूप चर्चेत आहे. शुक्रवारी (4 जून) बलात्कार आणि छेडछाड करण्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी त्याला अटक केले आहे. आता अशी माहिती आली आहे की, वसई न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या अभिनेत्यावर एका अल्पवयीन मुलीने बलात्कार केल्याचा आरोप लागला आहे.

पीडित मुलीने झालेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला आहे. तिने सांगितले की, त्याने कारमध्ये तिचा बलात्कार केला आहे. पर्ल वी पुरीवर पॉक्सो कायदा लावून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आले आहे.

मागच्या वर्षी ऑक्टोंबर महिन्यात पर्ल वी पुरी याच्या वडिलांचे निधन झाले, पण त्यावेळी तो त्याच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. काही दिवसांपूर्वी एका शोमध्ये त्याने सांगितले होते की, त्याच्या वडिलांना नव्हते वाटत की, त्याने अभिनेता बनावे. म्हणून तो घरातून पळून आला होता. त्यावेळी त्याच्याकडे पैसे नव्हते. तो केवळ पाणी पुरी खाऊन त्याची भूक भागवत होता. एकदा तर त्याने जवळपास 9 दिवस काहीच खाल्ले नव्हते.

त्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, पर्ल वी पुरीने 2013 मध्ये त्याच्या करिअरला सुरुवात केली. त्याने ‘दिल की नजर खुबसुरत’ या मालिकेतून टेलिव्हिजन दुनियेत प्रवेश केला. परंतु मुख्य अभिनेता म्हणून त्याला ‘फिर भी ना माने बदतमीज दिल’ या मालिकेतून ब्रेक भेटला.

यांनतर त्याने ‘नागार्जुन एक योद्धा’, ‘बेपनाह प्यार’, ‘नागिन 3’, ‘ब्रह्मराक्षस 2’ यांसारख्या मालिकेत काम केले. तसेच तो बिग बॉस 12 आणि 13 मध्ये पाहुणा म्हणून आला होता. यासोबतच तो ‘किचन चॅम्पियन 5’, ‘खतरा खतरा खतरा’ यांसारख्या शोमध्ये आला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.