Tuesday, October 14, 2025
Home साऊथ सिनेमा नागा आणि समंथाच्या घटस्फोटावर नागार्जुनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हे दुर्देवाने…’

नागा आणि समंथाच्या घटस्फोटावर नागार्जुनने दिली प्रतिक्रिया; म्हणाला, ‘हे दुर्देवाने…’

अभिनेता नागार्जुनने (Nagarjun) अलीकडेच त्याचा मुलगा आणि अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) आणि त्याची माजी पत्नी, अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samntha ruth prabhu) यांच्या घटस्फोटावर मौन सोडले. माध्यमांशी बोलताना नागार्जुनने चैतन्यसाठी हा ‘दुर्दैवी’ अनुभव असल्याचे सांगितले. तसेच तो आता त्याच्या आयुष्यातून बाहेर पडला आहे असे देखील सांगितले आहे. 

माध्यमांशी बोलताना नागार्जुन म्हणाला, “तो आनंदी आहे, एवढंच मला दिसतंय. हे माझ्यासाठी खूप चांगलं आहे. हा एक अनुभव आहे जो दुर्दैवाने त्याच्यासोबत घडला आहे. आम्ही त्याबद्दल मोकळेपणा ठेवू शकत नाही.  त्यामुळे मला आशा आहे की तो प्रत्येकाच्या आयुष्यातून निघून जाईल.”

या वर्षाच्या सुरुवातीला नागार्जुनने चैतन्य आणि समंथा यांच्या घटस्फोटावर बोलल्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली होती. त्याने जानेवारीमध्ये ट्विट केले होते की,  “माझ्या विधानाचा हवाला देत सोशल मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बातम्या आल्या होत्या. समंथा आणि नागा चैतन्य यांच्या बद्दलच्या बातम्या हे संपूर्ण खोटे आणि पूर्ण मूर्खपणा आहे!! मी मीडिया मित्रांना विनंती करतो की कृपया बातम्या म्हणून अफवा पोस्ट करण्यापासून परावृत्त करा.” त्यांनी हॅशटॅग जोडला अफवा नकोत बातम्या द्या.

नागार्जुन ब्रह्मास्त्र: भाग एक शिव मध्ये आहे, जो 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात नागार्जुनने अनिश शेट्टी या वास्तुविशारदाची भूमिका साकारली होती जो नंदी अस्त्र चालवतो. त्याच्याशिवाय अयान मुखर्जीच्या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत.

Nagarjuna
Photo Courtesy : Instagram/akkineninagarjuna7

नागा चैतन्य आणि सामंथा रुथ प्रभू यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वेगळे होण्याची घोषणा केली होती. त्यांनी आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन निवेदने जारी केली. सामंथाने तिच्या निवेदनात लिहिले, “आमच्या सर्व हितचिंतकांना. खूप विचार-विमर्शानंतर, चाय (चैतन्य) आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि स्वतःच्या मार्गाने जायचे आहे. आम्ही भाग्यवान आहोत की एक दशकाहून अधिक काळ असलेली मैत्री आमच्या नात्याचा गाभा होती आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्यामध्ये नेहमीच एक विशेष बंध असेल.” अशाप्रकारे त्यांनी सगळ्यांना त्यांच्याबद्दल सगळ्यांना सांगितले होते.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दोन दाक्षिणात्य दिग्गजांनी ऑस्करच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या यादीमध्ये मिळवले स्थान? चाहत्यांमध्ये आनंदाची लाट

महाराष्ट्रात राडा घालायला ‘राडा’ सिनेमा सज्ज, ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
प्रियांका आधी ‘या’ हॉलिवूड सुंदरी होत्या निक जोनासच्या गर्लफ्रेंड, वाचा यादी

हे देखील वाचा