Friday, April 19, 2024

‘जीव ह्या रिक्ततेचा अर्थ लावत बसला’, नागराज मंजुळेंची पोस्ट चर्चेत

मराठी सिनेसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत, दिग्दर्शक आहेत जे त्यांच्या एकाच चित्रपटामुळे खूप प्रसिद्धीच्या झोतात आले, यातीलच एक मोठे नाव म्हणजे नागराज मंजुळे. (Nagraj Manjule) संपूर्ण इंडस्ट्री त्यांना नागराज आण्णा या नावाने ओळखते. आतापर्यंत त्यांनी काही मोजकेच सिनेमे गेले आहेत, परंतु जे केले ते अगदी सुपरहिट झालेत. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे सैराट. ‘सैराट’ म्हटलं की, सगळ्यांच्या डोळ्यासमोर येतात ते नागराज मंजुळे.

नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शन आणि अभिनय देखील केलाय परंतु आता ते आपल्याला एका नव्या रूपात एका नव्या भूमिकेत सगळ्यांना दिसणार आहे. अनेकांना या गोष्टीची जाणीव देखील नसेल की, नागराज मंजुळे हे एक उत्तम कवी देखील आहे. त्यांचा कवितासंग्रह लवकरच त्यांच्या चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या गोष्टीची माहिती त्यांनी सोशल मीडिया अकाउंट वरून त्यांच्या चाहत्यांना दिली.

नागराज मंजुळे यांचे ‘रिकामटेकड्याचे आत्मवृत्त’ हा कविता संग्रह लवकरच प्रकाशित होणार आहे. त्यांनी या कवितासंग्रहाचे फोटो तसेच हा कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा कधी आणि कुठे होणार आहे याची माहिती त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट करून दिली आहे. तसेच या सगळ्या सोबत त्यांनी अत्यंत भाव कॅप्शन लिहिले आहे.

या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिले आहे की, “कविता हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. एखादी चांगली कविता वाचली की खूप समृद्ध झाल्यागत वाटतं.
काही वर्षांपूर्वी विक्रांतच्या तोंडून संग्रामच्या कविता ऐकल्या आणि भारावून गेलो.
नंतर कळलं की संग्रामनं एकही कविता कधी कुठं प्रकाशित केली नाही. अलुफ ,आत्ममग्न संग्रामनं त्याची कविता मित्रांच्या मैफिलीबाहेर कुठं जाऊच दिली नाही. संग्रामनं जणू आपल्याच गाळलेल्या जागा भरल्या आहेत.
ह्या रिकाम्या पोकळीत आपल्यागतच आणखी एक जीव ह्या रिक्ततेचा अर्थ लावत बसला आहे हे जाणून जरासं दुकटं वाटलं..”

त्यांच्या या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ४ वाजता सांगली येथे आयोजित करण्यात आला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
भाग्यश्रीचा पारंपारिक अंदाज पाहून तुम्हीही पडाल प्रेमात, फोटो पाहाच
शाहरुखच्या वक्तव्याने विकीच्या वडिलांना कोसळलं होतं रडू; म्हणालेले, ‘इज्जत करणं त्याच्याकडून शिकावं’
लिपस्टिकला हात लावल्यामुळे भडकली हिना, शेजारी उभ्या असलेल्या व्यक्तीला जोरात वाजवली कानाखाली

हे देखील वाचा