Friday, October 17, 2025
Home कॅलेंडर संवेदनशील नाना पहिल्या मुलाबाबत जन्मापासूनच होते नाराज, सतत दूर राहायचे; अखेर नियतीने डाव साधला अन्…

संवेदनशील नाना पहिल्या मुलाबाबत जन्मापासूनच होते नाराज, सतत दूर राहायचे; अखेर नियतीने डाव साधला अन्…

मराठी चित्रपट सृष्टी आणि बॉलिवूडचे दिग्गज, जेष्ठ कलाकार नाना पाटेकर यांचा 1जानेवारी रोजी 72 वा वाढदिवस होता. नाना पाटेकर यांचा जन्म 1जानेवारी 1951मध्ये रायगड जिल्ह्यात झाला होता.

एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांची देशातच नाही तर जगभरातही ओळख आहे. नाना यांची संवादफेक अतिशय उत्कृष्ट दर्जाची आहे. त्यांचा जीवनात अभिनय स्पष्ट संवादिक यांमुळे देखील नाना ओळखले जातात. नाना एक कौटुंबिक व्यक्ती आहेत. त्यांना साधं राहणं आणि परिवारासोबत वेळ घालवणं खूप आवडता.

nana patekar farmhouse
nana patekar farmhouse

नानांच्या 72 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांच्या मोठ्या मुलाशी निगडित एका घटना सांगणार आहोत. असं म्हणतात की. नाना त्यांच्या पहिल्या मुळापासून खूप लांब राहायचे.

नानाच्या पहिल्या मुलाच्या शरीरामध्ये काही दोष होते. जन्मताच त्याचा ओठ कापलेला होता, त्यामुळे नाना त्याला बघून खूप नाराज झाले. ते त्यांच्या मुळापासून लांब राहू लागले, मात्र त्यांची पत्नी आई असल्याने ती त्या मुलाचे सर्व करायची. नाना त्या मुलापासून दूर राहण्याचा प्रयत्न करायचे. पण एकदिवस असे काही घडले की, नाना त्या दिवसापासून एकही दिवस आपल्या मुलापासून दूर राहिले नाही.

एक दिवस नाना आणि तो मुलगा घरात एकटेच होते. तो मुलगा खेळात असताना त्याचा आवाज आणि त्या बाळाचा नानांना होणारा स्पर्श, नाना मधला बाप जागवत होता. अचानक नानांनी त्यांच्या मुलाला जवळ घेऊन त्याला आपल्या कुशीत घेतले आणि त्याचे लाड करायला लागले.

त्यादिवसानंतर त्यांनी कधीही त्यांच्या मुलापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र नियतीला ही भेट मान्य नव्हती, त्यानंतर काहीच दिवसांनी त्यांच्या मुलाची तब्येत खूप बिघडली आणि त्याने या जगाचा निरोप घेतला.

nana patekar Natasamrat
nana patekar Natasamrat

त्या मुलाला वाचवण्याचा खूप प्रयत्न झळा पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. मुलाच्या निधनाने नाना कोलमडले होते. पण त्यांनंतर त्यांना दुसरं अपत्य झालं तेव्हा कुटुंब पुन्हा सावरलं आणि नाना पुन्हा आनंदी राहायला लागले.(nana patekar birthday special why nana patekar was not happy with his first kid)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
नाना पाटेकरांचा लाडका मल्हार लूकमध्ये आहे वडिलांचीच कॉपी, ‘या’ क्षेत्रात बनवतोय करिअर

‘या’ कारणामुळे सलमान खानवर प्रचंड भडकले होते नाना पाटेकर; म्हणाले, ‘…त्याची लायकी नाहीये’

हे देखील वाचा