Monday, July 8, 2024

नाना पाटेकरांचा लाडका मल्हार लूकमध्ये आहे वडिलांचीच कॉपी, ‘या’ क्षेत्रात बनवतोय करिअर

नाना पाटेकर (Nana Patekar) यांचा मुलगा मल्हार लूकमध्ये हुबेहुब नानासारखा दिसतो. नानांप्रमाणेच त्यालाही साधेपणा खूप आवडतो. मल्हारने मुंबईतील सरस्वती मंदिर हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले आहे. त्याने वाणिज्य शाखेत पदवी घेतली आहे. मल्हारला लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याची आवड होती आणि तो प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करणार होता. पण नंतर नाना आणि प्रकाश झा यांच्यात भांडण झाले आणि नानाने प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला.

नंतर, मल्हारने राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांच्या ‘द अटॅक ऑफ 26/11’ या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. आता त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आहे, जे त्याने वडील नाना पाटेकर यांच्या नावाने सुरू केले आहे. त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव नाना साहेब प्रॉडक्शन हाऊस आहे. (nana patekars son malhar patekar is working in nana patekar productions since 2014)

नाना पाटेकर आणि त्यांची पत्नी नीलकांती पाटेकर यांनी एकमेकांना घटस्फोट दिलेला नसून, दोघेही खूप दिवसांपासून वेगळे राहत आहेत. मल्हार त्याच्या आईच्या जास्त जवळचा आहे. मल्हारला एक मोठा भाऊही होता, जो आता या जगात नाही. आपल्या मुलाच्या मृत्यूने नानांना खूप मोठा धक्का बसला होता आणि ते बराच काळ एकटे राहिले. मात्र, मल्हारच्या जन्मानंतर नानांना त्याचा आनंद परत मिळाला.

नाना पाटेकर यांनी त्यांच्या चाळीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत खूप कमाई केली. ठरवलं असतं, तर आज ते एक आलिशान जगणं जगू शकले असते. परंतु आज त्यांची आयुष्यभराची संपत्ती किती आहे माहितीये! फक्त चाळीस कोटी… इतर सगळे पैसे, संपत्ती त्यांनी गरीब गरजूंना दान केली आणि स्वतः अगदी साधं आयुष्य ते आज जगतायत.
याचाच पुढचा भाग म्हणूयात की काही वर्षांपूर्वी जेव्हा महाराष्ट्रात सतत दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होत होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढलं होतं. अशात त्यांनी आणि अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नाम फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली आणि याच संस्थेच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांच्या हितासाठी जितकी काही काम करता येतील तितकी करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
लग्नानंतर देवोलिना विशाल सिंहसोबत दिसली रोमँटिक अंदाजात; युजर्स म्हणाले, ‘ये रिश्ता क्या कहलाता है…’

‘तिला पाहुन आजही येतात डोळ्यात अश्रू येतात’, नाना पाटेकरांनी सांगितली ‘या’ अभिनेत्रीसोबतची लवस्टोरी

हे देखील वाचा