चित्रपट बनवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना दिग्दर्शक आणि निर्मात्यांना करावा लागतो. आपल्या आवडत्या आणि भूमिकेला सूट होणाऱ्या कलाकार घेण्यासाठी देखील खूप प्रयत्न करावे लागतात. त्यात जर दोन मोठे कलाकार एकाच सिनेमात घ्यायचे असतील तर सर्व संभाळणे अजून कठीण होते. दोन्ही कलाकारांच्या मनाप्रमाणे करत दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना आपले काम काढून घ्यावे लागते.
असाच ‘तिरंगा’ नावाचा एक सिनेमा 1993 साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात राजकुमार आणि नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत होते. या चित्रपटाने तुफान यश मिळवले, सोबतच नाना आणि राज कुमार यांच्या भूमिका आणि संवादही खूप लोकप्रिय झाले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक मेहुल कुमार यांनी एका मुलाखतीत चित्रपटाबद्दल सांगताना एका गोष्टीचा खुलासा केला होता.
त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ” मला या सिनेमात शिवाजीराव वागळे या भूमिकेसाठी नाना पाटेकरच पाहिजे होते. मात्र मी सिनेमासाठी जेव्हा जेव्हा नानांशी संपर्क केला तेव्हा तेव्हा त्यांनी आपण व्यावसायिक चित्रपट करत नसल्याचे कारण देत हा सिनेमा नाकारला. माझी मनापासून इच्छा होती की, चित्रपटात राजकुमार यांच्यासोबत नाना आणि नानाच दिसावे. मी एकदा नानांना सांगितले की, कृपया तुम्ही एकदा स्क्रिप्ट वाचा आणि मग निर्णय घ्या. सुदैवाने ते त्यासाठी तयार झाले.”
पुढे मेहुल कुमार म्हणाले, “नानांनी स्क्रिप्ट वाचली आणि सिनेमा करायला होकार दिला. पण त्यांनी माझ्यासमोर एक अट ठेवली आणि म्हणाले, “जर राजकुमार यांनी माझ्या कामात अडथळा आणला किंवा हस्तक्षेप केला तर मी त्वरित चित्रपटाचा सेट सोडेल.” मी नानांना ग्वाही दिली की असे होणार नाही. चित्रपटातील नाना आणि राजकुमार यांची भूमिका सारखीच होती. नाना आणि राजकुमार हे दोन्ही देशभक्त असल्याचे सिनेामांत दाखवण्यात आले होते. सिनेमात आणि प्रत्यक्ष आयुष्यातही दोघांच्याही कामाच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या. याचमुळे दोघांचे बिलकुल एकमेकांसोबत पटले नाही.”
मेहुल यांच्या सांगण्यानुसार शुटिंगच्यावेळी सेटवर कोणताही ताण नव्हता. राजकुमार आणि नाना पाटेकर जेव्हा एकमेकांसमोर यायचे तेव्हा ते कधीच एकमेकांशी बोलले नाही. मात्र सिनेमातील ‘पीले पीले’ या गाण्याच्या शुटिंगवेळी दोघांमध्ये थोडेफार बोलणे झाले होते.(nana would not ready to do tiranga movie)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नाना पाटेकरांचा लाडका मल्हार लूकमध्ये आहे वडिलांचीच कॉपी, ‘या’ क्षेत्रात बनवतोय करिअर
बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते असलेल्या संजय दत्त आणि नाना पाटेकर यांनी आजपर्यंत का केले नाही सोबत काम