पद्म विभूषण पुरस्काराचे मानकरी नासिर खान झाले होते सिनेजगतातून गायब, भाऊ दिलीप कुमार यांच्यासोबत केली होती करिअरची सुरुवात


सिनेजगताला चंदेरी दुनिया म्हणतात हे खरे आहे. या जगात आपले नशीब आजमावण्यासाठी रोज कोणीतरी पाऊल ठेवत असते. काही कलाकारांना खूप प्रसिद्धी मिळते, तर काही कलाकार या सिनेजगतात आपला जम बसवू शकत नाहीत. आज आपण अशा कलाकाराविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात खूप नाव कमावले, परंतु त्यानंतर हळूहळू ते सिनेजगातून बाहेर पडले. अभिनेता नासिर खान यांच्या बाबतीतही असेच घडले. आज त्यांच्याशी संबंधित गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

अभिनेता व दिलीप कुमार यांचे छोटे भाऊ नासिर खानसुद्धा या यादीतील नायक होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी आठ फिल्मफेअर, पद्म विभूषण आणि इतर बरेच मोठे पुरस्कार जिंकले आहेत. आपल्या चित्रपटाच्या प्रवासात त्यांनी २९ चित्रपटांत काम केले. नायक म्हणून त्यांचा शेवटचा चित्रपट होता ‘आदमी.’ या चित्रपटातील नायिकेशी त्यांनी नंतर लग्न केले. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, नासिर यांनी बेगम पारा यांच्याशी लग्न केले होते.

नासिर खान आपले भाऊ दिलीप कुमार यांच्यासमवेत, बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसले आहेत. यातील एक चित्रपट होता ‘गंगा जमुना.’ सत्येन बोस यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. दोन भावांच्या कथेवर विणलेल्या चित्रपटातसुद्धा खऱ्या आयुष्यातले भाऊ काम करत होते. त्यात नासिर खान यांनी पोलीस निरीक्षकाची भूमिका साकारली होती.

दिलीप कुमार आणि नासिर यांची कारकीर्द जवळपास एकाच वेळी सुरू झाली होती. १९४४ मध्ये दिलीप कुमार यांनी  ‘ज्वार भाटा’ चित्रपटाद्वारे कारकिर्दीची सुरुवात केली होती, तर १९४५ मध्ये नासिर खान ‘मजदूर’ चित्रपटाद्वारे कॅमेर्‍यासमोर आले होते. यानंतर नासिर यांनी ‘शहनाई’ चित्रपटात काम केले आणि यश मिळवले. त्याचवेळी दिलीप कुमार यांनी तोपर्यंत तीन यशस्वी चित्रपट केले होते.

त्यानंतर १९५१ मध्ये नासिर यांनी ‘नगीना’ चित्रपटात काम केले होते. त्यावेळी दिलीप कुमार ‘दीदार’ मध्ये अभिनय करत होते. त्यानंतर हळूहळू नासिर हे दिलीप कुमार यांच्यापेक्षा मागे पडले. काही काळानंतर त्यांनी चित्रपट जगताला निरोप दिला. त्यांनी नाशिकमध्ये शेती करण्यास सुरुवात केली. तेथे त्यांचे पोल्ट्री फार्मही होते.

बेगम पारा यांच्याशी लग्नानंतर या दोघांनाही तीन मुले झाली. यामध्ये मुलगा नादिर खान, दुसरा मुलगा अयूब खान आणि मुलगी लुबना खान यांचा समावेश आहे. अयूब नंतर बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनेता झाला. ३ मे, १९७४रोजी नासिर यांनी या जगाला निरोप दिला. त्यांची पत्नी बेगम पारा यांचेही ९ डिसेंबर, २००८ रोजी निधन झाले.

नासिर खान यांनी आपल्या कारकिर्दीदरम्यान ‘मजदूर’, ‘अंगारे’, ‘नाजनीन’, ‘हंगामा’, ‘नगीना’, ‘अगोश’, ‘श्रीमतीजी’, ‘जवाब’ सारख्या २९ चित्रपटांमध्ये काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-वैजयंती माला यांना नव्हते करायचे चित्रपटात काम, एका डान्स परफॉर्मन्सने बदलले आयुष्य

-प्रेमासाठी काहीही! प्रेम मिळवण्यासाठी ‘या’ कलाकारांनी चित्रपटात हद्दच केली पार, सुनील शेट्टीही यादीत सामील

-बॉलिवूडमधील ‘या’ प्रसिद्ध जोडप्यांना लग्नानंतर झाले नाही मूल, दिलीप कुमार अन् सायरा बानोचाही समावेश


Leave A Reply

Your email address will not be published.