राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आयोजित चित्रपट महोत्सवाचा द्वितीय पुरस्कार ‘वोंम्ब ऑफ मेळघाट’ लघुपटाला जाहीर


राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आयोजीत लघुचित्रपट महोत्सव २०२०च्या पुरस्कारांची नुकतीच घोषणा झाली आहे. यात डॉ. नितीन वसंतराव गणोरकर दिग्दर्शित ‘वोंम्ब ऑफ मेळघाट’ लघुपटाला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे.

हा लघुपट विस्थापन या विषयावर प्रकर्शाने प्रकाश टाकतो. यात मेळघाटातील अदिवासी समुदायाचे व्याघ्र प्रकल्पातून जे स्थलांतर झाले, त्यानंतर ज्या काही सामाजिक, प्रशासकिय व आर्थिक प्रश्न निर्माण झाले, हे दाखविण्यात आले आहेत.

रुषीकेश खंबायत या तरुणाने या लघुपटाचे चित्रीकरण व संपादन केले असून चित्रपटाची लांबी ९ मिनीट ५४ सेकंद एवढी आहे. या चित्रपटात उत्पाद नेपथ्य विभाग डॉ. निशा केमसे-कांबळे यांनी सांभाळला असून प्रा. स्वप्निल कांबळे यांनी सहगदिग्दर्शन केले आहे.

लघुचित्रपट विश्वात अतिशय मानाच्या समजल्या जाणाऱ्या भारत सरकारच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या या लघुपट महोत्सवात रवींद्र माणिक जाधव दिग्दर्शित ‘थलसार बंगसार’ या चित्रपटाला पहिला क्रमांक मिळाला असून या पुरस्काराची रक्कम दोन लाख रुपये आहे. तर दीड लाख रुपयांचे द्वितीय पारितोषीक ‘वोंम्ब ऑफ मेळघाट’ या मराठी व थोमास जाकोब दिग्दर्शित ‘अन्नाम’ मल्याळम चित्रपटाला दिले जाणार आहे.

२०२० वर्षातील या लघुपट महोत्सवासाठी भारतभरातून तब्बल ९३ लघुपट आले होते. भारताचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोग दरवर्षी या महोत्सावचे आयोजन करते. या वर्षीचे महोत्सवाचे सहावे वर्ष होते.


Leave A Reply

Your email address will not be published.